Hair Mask For Damaged Hair Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Mask For Damaged Hair : कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी या हेअर मास्कचा वापर करा

केसांची काळजी कशी घ्याल ?

कोमल दामुद्रे

Hair Mask For Damaged Hair : निरोगी व चमकदार केस मिळवण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतो. खाण्यापिण्याच्या काही सवयींमुळे व प्रदूषणांमुळे आपल्या केसांवर त्याचा परिणाम होतो.

केसांची योग्य काळजी घेतल्यानंतर ते गळत देखील नाही व कोरडे देखील होत नाही. आपण दिवसभर व्यस्त असल्यामुळे आपण केसांच्या आरोग्याबद्दल विसरुन जातो. परंतु, झोपताना देखील आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो.

दिवसभर आपण व्यस्त असल्यामुळे केसांकडे दुर्लक्ष होते त्यासाठी आपण त्याची काळजी कशी घेऊ शकतो हे जाणून घ्या. यामुळे आपल्या केसांची (Hair) चमक देखील वाढेल व केस मुलायम होतील.

१. मध आणि भोपळा -

केसांची काळजी घेण्यासाठी आपण त्यांना मध व भोपळ्याचे मिश्रण लावू शकतो. भोपळा चांगला मॅश करुन त्यात मध मिसळा. हा हेअर पॅक आपल्या केसांना व टाळूला लावा व रात्रभर तसाच ठेवा. मऊ व चमकदार केस मिळवण्यासाठी सकाळी केस धुवा.

२. ऑलिव्ह ऑईल, कोरफड व अंड्यातील पिवळ बलक -

केसांसाठी अंड हे फायदेशीर मानले जाते. परंतु, नुसतेच अंडे केसांना लावले तर त्याता उग्र वास येऊ लागतो. आपण ऑलिव्ह ऑईल (Oil), कोरफड व अंड्यातील पिवळ बलकचे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण डोक्याला व टाळूला लावून त्याची चांगली मालिश करा. केस स्वच्छ धुवा

३. एरंडेल तेल, केळी आणि बिअर -

केसांचे सौंदर्यं जपण्यासाठी आपण केळीला चांगले मॅश करुन त्यात एरंडेल तेल बिअरचा समावेश करा. हा हेअर मास्क केसांच्या मुळाला व टाळूला मसाज करा व रात्रभर तसेच ठेवा. सकाळी केस कोमट पाण्याने धुवा.

४. आर्गन तेल आणि नारळाचे दूध -

केसांच्या लांबीवर व केसांना पोषण मिळण्यासाठी आपण नारळाच्या दूधात आर्गन तेल घालून केसांसाठी उत्कृष्ट कंडिशनर म्हणून काम करू शकतो. त्यामुळे केस रेशमी व मुलायम होतात.

५. एरंडेल आणि रोझमेरी तेल -

केस गळती व केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण केसांना एरंडेल व रोझमेरी तेलाचा वापर करु शकतो. या तेलांचा वापर नियमित केल्याने केसांना त्याचा फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

Bihar Election Result : बिहारमध्ये सत्ता कुणाकडे? पहिला कौल भाजपच्या बाजूने, एनडीएची मोठी आघाडी

SCROLL FOR NEXT