Remove Hair Greasiness Without Washing google
लाईफस्टाईल

No-Wash Hair Tips : आता केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी केस धुण्याची गरज नाही, या टिप्स फॉलो करा

Greasy Hair Solution : केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी केस धुण्याची गरज नाही. गुलाबपाणी, ब्लॉटिंग पेपर आणि टॅल्कम पावडरने सोपे उपाय करून तुम्ही केसांना तेलकटपणातून मुक्त करू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्याच्या दिवसांत वातावरण सारखं बदलत असतं. पाऊस धो-धो बरसत असला की थंडी जाणवते, तर उघडीप दिली तर उष्णता वाढते. त्यामुळं घाम येतो; तसेच हवेतील धूळ-माती चेहऱ्यासह केसांवरही बसते. केस तेलकट आणि चिकट होतात. यामुळे केसांची हवी तशी स्टाईल करणे कठीण जातं. शिवाय तेलकट आणि चिकटपणा केसांची चमक घालवतो. धावपळीच्या जीवनात रोज किंवा दोन दिवसांनी केस धूणं अशक्य होतं. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी काही हेअर केअर हॅक्स करू शकता, जे तुमच्या केसांचा तेलकट आणि चिकटपणा घालवतील व केस चमकदार, सुटसुटीत होतील.

केस न धुताही केसांचा चिकटपणा घालवायचा असेल तर, गुलाब पाणी उत्तम पर्याय आहे. एका स्प्रे बाटलीत गुलाब पाणी भरून ठेवा. जेव्हाही तुमचे केस तेलकट किंवा चिकट होतील, तेव्हा थोड्या प्रमाणात स्कॅल्प आणि केसांवर स्प्रे करा. हलक्या हातांनी मसाज करा. नंतर फणीने केस विंचरा. याने तुमचे केस तर ताजेतवाने राहतीलच, केसांना छान सुगंधही येईल. तसेच मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढून केसांची वाढ होईल.

अचानक कुठे बाहेर जायचं ठरतं पण तुमचे केस चिकटपणामुळे सुटसुटीत दिसत नाहीत. अशावेळी हवी तशी हेअर स्टाईल करता येत नाही, याचा परिणाम संपूर्ण लूकवर होतो. यापासून वाचण्यासाठी तुम्ही ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने एक सोपा हॅक करू शकता. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापर केला जातो. याचा वापर करून तुम्ही स्कॅल्पवरील तेलही कमी करू शकता. यासाठी ब्लॉटिंग पेपर घेऊन स्कॅल्पवर हलके दाबून ठेवा. जेणेकरून ते अतिरिक्त तेल शोषून घेईल.

तुमच्याकडे असलेली टॅल्कम पावडरही तुमच्या केसांचा तेलकट आणि चिकटपणा घालवू शकते. थोडी टॅल्कम पावडर केसांवर शिंपडा आणि हेअर ब्रशने केस विंचरा. याने केसांच्या जटा सोडवणे सोपे होईल आणि केस सुटसुटीत दिसतील. केसांवरील अतिरिक्त पावडर झटकून टाका, नाहीतर केस राखाडी आणि रखरखीत दिसतील. शिवाय केस विंचरल्यानंतर मऊ दात असलेल्या ब्रशने स्कॅल्प स्वच्छ करा. यामुळे केसांवरील अतिरिक्त तेल कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

Avneet Kaur: पिंक बार्बी डॉल...; अवनीत कौरचा एलिगन्ट ग्लॅमरस लूक पाहिलात का?

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT