Hot Water vs Cold Water for Hair Saam TV News
लाईफस्टाईल

Hair Care Tips: केस धुण्यासाठी साधं पाणी वापरायचं की थंड? 'ही' एक चूक टाळा; तज्ज्ञांचा मोठा सल्ला

best water temperature for washing hair in winter : हिवाळ्यात केस धुण्यासाठी गरम पाणी वापरावे की थंड? अतिगरम पाण्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. केस धुण्यासाठी कोणते पाणी योग्य आहे, याबाबत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Hot Water vs Cold Water for Hair : केस निरोगी आणि मजबूत राहावेत म्हणून आपण नियमितपणे केस धुतो. पण हिवाळा सुरू झाला की केस धुण्यासाठी गरम पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं की साधं पाणी वापरायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. पाण्याच्या तापमानाचा केसांवर आणि टाळूच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? केस धुण्यासाठी कोणतं पाणी सर्वात योग्य आहे? याबद्दल त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुनील कुमार प्रभू काय सांगतात, हे जाणून घेऊयात.

केस धुण्याने टाळूवरचा घाम, अतिरिक्त तेल, धूळ-माती आणि केसांना लावलेल्या शाम्पू अथवा इतर उत्पादनांचे कण निघून जातात. त्यासाठी थंड किंवा साधं पाणी वापरता येतं, पण खोलीच्या तापमानाइतकं म्हणजेच नॉर्मल पाणी किंवा किंचित कोमट पाणी वापरणं सर्वात सोयीचं आणि आरामदायी असल्याचे सुनील कुमार यांनी सांगितलं. त्यांनी त्याचं कारणही सांगितलं आहे. खूप गरम पाणी वापरल्यास टाळूवरचं नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस कोरडे, निस्तेज होतात आणि तुटण्याचा धोका वाढतो. पण खूप गरम पाण्याने थेट टक्कल पडतं असं नाही. दुसरीकडे, थंडीच्या दिवसांत एकदम थंड पाणी वापरणं त्रासदायक वाटू शकतं.

थंड पाण्याने केस चमकदार आणि मऊ वाटू शकतात. पण त्याचा परिणाम थोड्या वेळापुरताच मर्यादित राहतो. केसांचं आरोग्य फक्त पाण्याच्या तापमानावर अवलंबून नसतं. अनुवंशिकता, आहार, टाळूची स्वच्छता, केसांची निगा राखण्याच्या सवयी आणि इतर आजार यांसारख्या अनेक गोष्टींचा त्यावर परिणाम होतो. त्यामुळे अतिथंड किंवा अतिगरम पाण्याऐवजी केस धुण्याची पद्धत योग्य असणं जास्त गरजेचं आहे.

नॉर्मल किंवा किंचित कोमट पाणी वापरा आणि टाळूच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडण्याचा सल्ला डॉ. सुनील कुमार प्रभू यांनी दिला आहे. तसेच ज्यांचा टाळू तेलकट आहे त्यांनी थोड्या जास्त वेळा केस धुवावेत. तर कोरड्या केसांसाठी कमी वेळा धुऊन कंडिशनर लावणं फायदेशीर ठरतं, असेही त्यांनी सांगितलेय. शॅम्पू टाळूवर लावावा तर कंडिशनर केसांच्या लांबीवर व खालच्या टोकांवर लावावा. ओले केस नाजूक असल्याने ते टॉवेलनं जोरात घासून पुसू नका, तर हलक्या हाताने कोरडे करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : हिवाळ्यात रोज खा मेथी-सुंठाचा १ लाडू! शरीराला मिळेल ऊर्जा, जाणून घ्या रेसिपी

Maharashtra News Live Update: अलिबागमध्ये शेतकऱ्याच्या भाताच्या उडवीला आग! २५० भाताचे भारे जळून खाक

Gig Workers : ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! डिसेंबरपासून मिळणार पेन्शन अन् विम्याचा लाभ? A टू Z माहिती वाचा

Accident: महामार्गावर अपघाताच थरार! भरधाव लोडरची टेम्पोला धडक, अपघातामध्ये क्रिकेटपटूसह ४ जणांचा मृत्यू

Jacket Cleaning Tips: प्रत्येक जॅकेट ड्राय क्लिनिंगला देताय? थांबा...! फॅब्रिकनुसार जाणून घ्या कोणते घरच्या घरी धुता येतील

SCROLL FOR NEXT