Hair Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केसांना Vitamin E लावताय? योग्य पद्धत जाणून घ्या, केस होतील सिल्की आणि शायनी

How To Apply Vitamin E For Hair : व्हिटॅमिन ईच्या वापराने केस मऊ होतात, केसांना चमक येते, केस गळणे कमी होते, केसांची वाढ होण्यास मदत होते. जाणून घेऊया केसांना व्हिटॅमिन ई कसे लावावे.

कोमल दामुद्रे

Vitamin E Benefits :

चेहऱ्याच्या सौंदर्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हे केस असतात. केसगळतीची समस्या, केस कोरडे होणे किंवा केसांची वाढ खुंटणे यामुळे सध्या जगभरातील ९०टक्के लोक त्रस्त आहेत.

केसांमुळे (Hair) चेहऱ्याचे सौंदर्य तर टिकून राहाते. परंतु, केसगळतीमुळे अनेकदा टक्कल पडण्याची भीती देखील वाटते. केस लांबसडक होण्यासाठी आपण अनेक रासायनिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करतो. ज्यामुळे केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

बरेचदा आपल्याला केसांना व्हिटॅमिन ई लावण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे केसांची खुंटलेली वाढ ही सुरळीत होते. व्हिटॅमिन ई टाळू आणि केसांसाठी खूप फायदेशीर (Benefits) असल्याचे मानले जाते. व्हिटॅमिन ई मध्ये अँटी-ऑक्सिडेंट आहे जो ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि टाळूचे नुकसान करणारे मुक्त रॅडिकल्स कमी करण्याव्यतिरिक्त निरोगी केसांच्या फोलिकल्सला मदत करते.

व्हिटॅमिन ईच्या वापराने केस मऊ होतात, केसांना चमक येते, केस गळणे कमी होते, केसांची वाढ होण्यास मदत होते. जाणून घेऊया केसांना व्हिटॅमिन ई कसे लावावे ते.

1. व्हिटॅमिन ई आणि जोजोबा तेल

केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई आणि जोजोबा तेल एकत्र लावण्याने फायदा होतो. एका भांड्यात व्हिटॅमिन ई च्या ३ ते ४ कॅप्सूल तर २ चमचे जोजोबा तेल घाला. तयार मिश्रण केसांना मुळापासून टोकांपर्यंत लावा. सकाळी केस धुवा. असे आठवड्यातून एकदा केल्याने फायदा होईल.

2. हेअर मास्क

खोबरेल तेलात (Oil) दही आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिसळा. त्याची पेस्ट तयार करुन डोक्याला किमान तासभर लावा. नंतर केस धुवा. असे केल्याने केस शायनी व सिल्की होतात.

3. शाम्पू

तुमच्या शाम्पूमध्ये देखील व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिसळून लावू शकता. ज्यामुळे केसांची निगा राखण्यास मदत होईल. तसेच केसांना अधिक फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT