Hair Scrub Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Scrub : हिवाळ्यात अधिक केसगळती होते ? हा हेअर पॅक ठरेल फायदेशीर

आपले केस चांगले आणि सुंदर दिसावेत अशी बहुतेकांची इच्छा असते

कोमल दामुद्रे

Hair Scrub : अनेक लोक सुंदर केसांना सौंदर्याचे माप मानतात. आपले केस चांगले आणि सुंदर दिसावेत अशी बहुतेकांची इच्छा असते, पण हिवाळा येताच केसांशी संबंधित अनेक समस्या वाढू लागतात.

यादरम्यान डोक्याला खाज सुटणे, केस गळणे आणि केस कोरडे पडणे अशा अनेक समस्या उद्भवतात. केसांची निगा राखणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, अशा समस्या पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे होतात. केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कॉफीशी संबंधित रेसिपी येथे सांगितली जात आहे, ज्यामुळे तुमचे केस निरोगी होतील.

अशा प्रकारे कॉफी वापरा

1. जर तुम्हाला हिवाळ्यात केसांच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर कॉफी पावडरमुळे या समस्यांपासून सुटका मिळू शकते. तुम्हाला फक्त 4 ते 5 चमचे कॉफी पावडर घ्यायची आहे आणि ती एका स्प्रे बाटलीत भरून पाण्यात मिसळायची आहे. ते चांगले मिसळा आणि केसांवर स्प्रे करा. हे केल्यानंतर 20 मिनिटांनी डोके धुण्यास विसरू नका. असे केल्याने केसांची चमक परत येईल.

Hair Scrub

2. कॉफीशी संबंधित ही दुसरी रेसिपी कोरड्या केसांची समस्या दूर करेल आणि तुमचे केस मऊ करेल. तुम्हाला फक्त एक चमचा कॉफी पावडर अर्धा कप खोबरेल तेलात मिसळावे लागेल आणि ते गरम करा, नंतर डोक्याला मसाज करा. १५ मिनिटांच्या मसाजनंतर डोके धुवा आणि केसांना (Hair) कंडिशनर लावा. त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल.

3. कॉफी (Coffee) स्क्रब डोक्यातील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. केसांची काळजी घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 2 चमचे मध 2 चमचे कॉफीमध्ये मिसळा आणि नारळाच्या तेलात मिसळा. डोक्याला लावल्याने कोंडा नाहीसा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora : मलायका अरोरा झाली मालामाल; विकलं मुंबईतील आलिशान अपार्टमेंट, नफा वाचून बसेल धक्का

Maharashtra Live News Update: आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचे नेते आणि वकील महासंघाची महत्वाची बैठक

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

SCROLL FOR NEXT