Guru Vakri 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Guru Vakri 2023 : मेष राशीत गुरुची चाल! 12 राशींवर कसा पडेल प्रभाव, होईल आर्थिक तंगीची अडचण

Guru In Kundali : ४ सप्टेंबरला गुरु हा ग्रह मेष राशीत वक्री झाल्यामुळे १२ राशींवर कसा प्रभाव पडणार आहे.

कोमल दामुद्रे

Guru In Mesh Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट वेळेनुसार प्रत्येक ग्रहांचे संक्रमण होत असते. गुरु हा ग्रह नऊ ग्रहांमध्ये अंत्यत शुभ मानला जातो. नुकताच गुरु हा ग्रह प्रतिगामी झाल्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.

गुरु हा ग्रह सुख, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य संपन्न मानला जातो. ४ सप्टेंबरला गुरु हा ग्रह मेष राशीत वक्री झाल्यामुळे १२ राशींवर कसा प्रभाव पडणार आहे. कोणत्या राशीला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. कोणाला कार्यक्षेत्रात यश मिळेल हे जाणून घेऊया.

1. मेष

या राशीचे लोक कोणत्याही प्रकल्प किंवा नोकरीच्या (Job) बाबतीत नवीन सुरुवात करतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

2. वृषभ:

हा काळ वैयक्तिक वाढीच्या दृष्टीने चांगला आहे. आरोग्याकडे (Health) विशेष लक्ष द्यावे लागेल. तुम्ही नवीन सहलींमध्ये सहभागी व्हाल, यामुळे तुमच्या जीवनात चांगले बदल होण्याची शक्यता आहे.

3. मिथुन:

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर (Benefits) राहील. आर्थिक स्थिती वाढेल. नेटवर्किंगच्या संधी मिळतील, याद्वारे तुम्हाला नवीन लोक भेटतील.

4. कर्क :

कठोर परिश्रम करावे लागतील आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. मात्र, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या कामात तुमची ओळख निर्माण होईल आणि लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

5. सिंह

या राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव राहील. नवीन ठिकाणांचा अनुभव घेता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात उत्साह दाखवावा. तुमच्या मेहनतीने ध्येय साध्य करू शकतील.

6. कन्या

या राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्राचा विचार करावा. तुम्ही तुमच्या नवीन गोष्टीवर काम करू शकता आणि आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेऊ शकता.

7. तूळ

या राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ.

8. वृश्चिक

या राशीच्या लोकांना नोकरीत बढती आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कायद्याशी संबंधित कामात विलंब होऊ शकतो, परंतु निकाल तुमच्या बाजूने लागेल.

9. धनु

या राशीचे लोक त्यांच्या नातेवाईकांना किंवा प्रियजनांना भेटू शकतात. हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने खूप शुभ आहे.

10. मकर:

या राशीच्या लोकांना मालमत्ता आणि वाहनांमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. कुटुंबातील तणावाची परिस्थिती सुधारण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

11. कुंभ:

दैनंदिन जीवनातून बाहेर पडून नवीन प्रवासाचा अनुभव घेता येईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.

12. मीन:

कुटुंबातील सदस्यांशी भावनिक संबंध दृढ होतील आणि आर्थिक स्थितीही सुधारेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT