Gudi Padwa
Gudi Padwa Saam Tv
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2024 Muhurt: यंदा गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या तिथी आणि पूजा पद्धत

कोमल दामुद्रे

Gudi Padwa 2024 Information in Marathi:

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातला पहिला सण असून यादिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा (Celebrate) केला जातो.

गुढीपाडव्याचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यादिवसापासून चैत्र नवरात्रारंभ होते. गुढीपाडव्याला संवत्सर पाडो म्हणूनही ओळखले जाते. यादिवशी नवीन वस्तूंची खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. महाराष्ट्रातील अनेक घराच्या दारात गुढी उभारली जाते. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. तसेच गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

गुढीपाडव्याला कर्नाटक आंध्रप्रदेशामध्ये युगादी किंवा उगादी या नावाने साजरा केले जाते. पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश ''पाडवा''. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्रशुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून याला चैत्रपाडवा असे देखील म्हटले जाते.

1. गुढीपाडवा २०२४ कधी? (Gudi Padwa 2024 Date)

यंदा गुढीपाडव्याचा सण हा ९ एप्रिल २०२४ ला साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण (Festival) साजरा केला जातो. या दिवशी दारोदारी गुढी उभारली जाते.

2. गुढीपाडवा २०२४ शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2024 Muhurt)

हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला ८ एप्रिल २०२४ ला सकाळी ११.५१ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ९ एप्रिल २०२४ ला रात्री ८.३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. तिथीनुसार यंदा गुढीपाडव्याचा सण हा ९ एप्रिलला साजरा केला जाईल.

3. गुढीपाडवा पूजा विधी (Gudi Padwa 2024 Puja Vidhi)

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा सण आहे. गुढी उभारल्यावर गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा केली जाते. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा केली जाते. तसेच गोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला

Today's Marathi News Live : सांगलीत कॉफी शॉप तोडफोड प्रकरणी १६ जण ताब्यात

Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, संशयित आरोपी बिभव कुमार घरातून गायब

Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

SCROLL FOR NEXT