Gudi Padwa 2025 ai
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2025 Recipes: गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी, आताच नोट करा चमचमीत पदार्थांच्या रेसिपी

Gudi Padwa 2025 Special Thali : गुढीपाडव्याला पारंपारिक पदार्थ घरात तयार केले जातात. त्यामध्ये नेमके कोणते पदार्थ असतात? आणि महत्वाचं म्हणजे गोड पदार्थ काय तयार करायचा हा प्रश्न पडत असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी आहे.

Saam Tv

Gudi Padwa 2025 Special Thali : यंदा गुढी पाडवा ३० मार्च २०२५ रविवारी असणार आहे. हा मराठी लोकांसाठी नवीन वर्षाचा शुभारंभाचा दिवस आहे. या शुभ दिवशी कुटुंबातील सर्व लोक पहाटे अंघोळ करतात. घरात झाडलोट करतात, केरकचरा काढतात. सकाळी दारात सुंदर रांगोळी काढून, गुढी उभारतात. ही सगळी कामे आवरली की येते जेवणाची वेळ. गुढीपाडवा म्हंटल तर गोड पदार्थ हा आवर्जून केलाच जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच गोड पदार्थांची रेसिपी सांगणार आहोत. त्यामध्ये तुम्ही विविध फळांचा वापर करून एक स्वीट डीश तयार करू शकता.

गुढीपाडवा स्पेशल थाळी डिश

गुढीपाडव्याला पारंपारिक पदार्थ घरात तयार केले जातात. त्यामध्ये नेमके कोणते पदार्थ असतात? हे जाणून घेऊया. त्यासोबत थाळी वाढताना पहिला कोणता पदार्थ वाडायचा शेवटी काय वाडायचं हे क्रमाने समजून घ्या. सुरुवातीला मीठ, कैरीचं लोणचं, लिंबू, शेंगदाण्याची चटणी, कोथिंबीर वडी, कांदा भजी, काकडीची कोशिंबीर, चणा डाळ कोबीची भाजी, सुकी बटाट्याची भाजी, वाटाणा रस्सा भाजी, श्रीखंड, आमरस, मसाले भात, वरण भात तूप, पुरणपोळी, पुरी, तळलेली मिरची आणि ताक. ही पारंपारिक डीश आहे.

गुढीपाडव्याला तुम्हाला गोड पदार्थ बनवायचे असतील तर श्रीखंड किंवा बर्फी हा उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊ रेसिपी.

आंबा बर्फी

साहित्य

दोन वाट्या गव्हाचे जाडसर पीठ, २०० ग्रॅम गूळ, २ चमचे तूप, १ छोटा चमचा वेलची पूड, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स भरड, २ वाट्या आंबा गर इ.

कृती

सर्वप्रथम गुळाचा दोनतारी पाक तयार करावा. त्यानंतर तुपात पीठ खमंग भाजून घ्यावे. मग त्यात वरील सर्व पदार्थ घालून छान परतावे. तयार झालेल्या मिश्रणात गुळाचा पाक घालून नीट एकत्र करावा. नंतर हलक्या हाताने ताटाला तूप लावून मिश्रण त्यावर पसरून वड्या पाडाव्यात.

पपया श्रीखंड

साहित्य

दोन वाट्या चक्का, १ छोटा चमचा वेलची पूड, २ वाट्या बनारसी साखर, १ वाटी पपई गर, अर्धी वाटी पपईचे तुकडे, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स भरड इ.

कृती

सर्वप्रथम चक्क्यात साखर वेलची पूड आणि पपईचा गर घालून चांगले घोटून घ्यावे. त्यानंतर त्यात भरडलेले ड्रायफ्रुट्स मिसळून पुन्हा एकत्र करावे. मग सजावटीसाठी वरून पपईचे तकडे पसरावेत. स्वादिष्ट पपया श्रीखंड फ्रीजमध्ये सेट करून गरमागरम पुऱ्यांबरोबर सर्व्ह करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT