Gudi Padwa 2024 Images in Marathi Saam TV
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2024 Wishes: गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची... तुमच्या प्रियजनांना द्या गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मराठीतून शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2024 Wishes in Marathi: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील पहिला सण. यंदा हा सण ९ एप्रिलला साजरा केला जाणार आहे.

कोमल दामुद्रे

गुढीपाडवाच्या शुभेच्छा In Marathi :

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील पहिला सण. यंदा हा सण ९ एप्रिलला साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा (Celebrate) केला जातो.

यादिवसापासून चैत्र नवरात्रारंभ होते. गुढीपाडव्याला संवत्सर पाडो म्हणूनही ओळखले जाते. यादिवशी नवीन वस्तूंची खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. यादिनानिमित्त आपण व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना मेसेज करु शकता. तसेच स्टेटस ठेवून तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.

1. गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नववर्षाच्या (New Year) शुभेच्छा...

2. उभारा गुढी आपल्या दारी…

सुख-समृद्धी येवो घरी

पाडव्याची नवी पहाट

घेऊन येवो सुखाची लाट

तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना..

गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

3. चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा

साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने

साजरा करा पाडव्याचा सण !

पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

4. गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

5. नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत जसे चंदन

नूतनवर्षाभिनंदन !!

6. नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

7. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

8. उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

9. सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात

दिवस सोनेरी

नव्या वर्षाची सुरुवात

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

SCROLL FOR NEXT