Grah Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Grah Gochar 2024 : जानेवारी महिन्यात ४ ग्रहांचे संक्रमण! पैशांची चणचण होईल कमी, नुकतेच लग्न झालेल्यांनी काळजी घ्या

January Horoscope 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ४ ग्रहांच्या संक्रमणामुळे लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग तयार होत आहेत.

कोमल दामुद्रे

Grah Gochar January 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ४ ग्रहांच्या संक्रमणामुळे लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग तयार होत आहेत.

बुधाचे संक्रमण वृश्चिक राशीत होत असून काही दिवसांनी धनु राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सूर्य आणि बुधामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. १५ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. तर शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे कन्या आणि वृश्चिक राशीसह ५ राशींच्या लोकांच्या नशीबाचे दार उघडणार आहे. जाणून घेऊया

1. मेष

जानेवारी महिन्यात मेष राशीच्या लोकांची रखडलेली कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीत फायदा होईल. नुकतेच लग्न झालेल्यांनी सावध राहायला हवे. अडकलेले पैसे (Money) मिळतील. वैवाहिक जीवनात आनंद येईल.

2. वृषभ

लक्ष्मी नारायणाच्या शुभ योगामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल. या काळात वाहन खरेदी करु शकता. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळेल. प्रत्येक कामात यश (Success) मिळेल.

3. कन्या

ग्रहांच्या संक्रमणामुळे कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. व्यवसाय पुढे नेण्यास यश मिळेल. कामात सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीच्या नव्या संधी मिळतील.

4. वृश्चिक

कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहिल. तुमच्या संपत्ती वाढ होण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. जवळची व्यक्ती दूरावण्याची शक्यता आहे. प्रेमात अपयश मिळेल. कामात प्रगती होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT