गुगलने प्ले स्टोरवरून काही भारतीय अॅप्स हटविण्याचा निर्णय घेतला होता. गुगलने घेतलेल्या निर्णयाचा स्टार्टअप सीईओ आणि संस्थापकांनी विरोध केला. तसेच सरकारनेही नाराजी व्यक्त केली. यानंतर गुगलने काही भारतीय अॅप्स प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय मागे घेतला. (Latest Marathi News)
गुगलने शुक्रवारी सांयकाळी १० भारतीय अॅप प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज शनिवारी गुगलने अॅप्स हटविण्याचा निर्णय मागे घेतला. यात शादी डॉट कॉम, नौकरी डॉट कॉम, ९९ एकर्स या सारख्या अॅप्सचा सामावेश आहे.
गुगलने निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर गुगलने निर्णय मागे घेतला. वाद मिटविण्यासाठी गुगल आणि अॅप्स मालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीआधीच गुगलने निर्णय मागे घेतला.
मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण सर्व्हिस फीस पेमेंट न देण्यावर सुरु झालं होतं. यानंतर गुगलने काही अॅप्स हटविण्याचा निर्णय घेतला. काही स्टार्टअप मालकांचं म्हणणं होतं की, गुगलने या प्रकारे चार्ज आकारू नये. यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं.
गुगलने हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी टीका केली. Kuku FM के CEO लाल चंद बिशु यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत गुगलच्या निर्णयावर टीका केली. इतर स्टार्टअप सीईओंनी गुगलच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
गुगलने काही अॅप्सवर कारवाई केली होती. Kuku FM,Bharat Matrimony , shaadi.com , naukri.com , 99 acres, truly madly , quack quack, stage , ALTT
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.