Google Pixel Foldable phone  Saam Tv
लाईफस्टाईल

Google Pixel Foldable phone : जबरदस्त डिस्पेलसह लॉन्च होणार Google Pixel फोन, जाणून घ्या फीचर्स व किंमत

Google Pixel : गुगल पिक्सेल फोल्डची चर्चा खूप दिवसांपासून होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Google Pixel New Phone : गुगल पिक्सेल फोल्डची चर्चा खूप दिवसांपासून होत आहे. अखेर त्याचा टीझर रिलीज झाला आहे. म्हणजेच त्याचे लॉन्चिंग देखील निश्चित झाले आहे. कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

कंपनीने पोस्टमध्ये लिहिले आहे की हा फोन (Phone) 10 मे रोजी होणाऱ्या Google I/O 2023 इव्हेंटमध्ये सादर केला जाईल. रिलीज झालेल्या टीझरमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की Google Pixel Fold चा लूक Samsung Galaxy Z Fold 4 सारखा दिसत आहे. Pixel 7 Series सारखे कॅमेरा मॉड्यूल फोनच्या मागील पॅनलमध्ये आढळेल.

Google Pixel Fold चा व्हिडिओ टीझर (Teaser) मेड बाय गुगलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये फोनची लॉन्च डेट 10 मे नमूद करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या डिस्प्लेचा आकार खूप मोठा दिसत आहे. #GoogleIO ड्युअल रिअर कॅमेरा (Camera) सेटअप, मागे एलईडी फ्लॅशलाइट देण्यात आला आहे. कॅमेरा बार इतर Pixel उपकरणांसारखाच दिसतो.

फीचर्स -

रिपोर्ट्सनुसार, Pixel Fold मध्ये 5.8-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. (Google Pixel Fold) जो 7.6-इंचाचा टॅबलेट बनण्यासाठी उघडतो. रिपोर्ट्सनुसार, यामध्ये गुगल टेन्सर जी2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

किंमत -

गुगल या स्मार्टफोनची किंमत $1,700 ठेवू शकते. सॅमसंगने आपला Samsung Galaxy Z Fold 4 $1,799 मध्ये लॉन्च केला.

कॅमेरा -

Google Pixel Fold मध्ये 9.5MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी 8MP कॅमेरा आहे. हे IPX8 वॉटर रेझिस्टंट आणि USB टाइप C 3.2 Gen 2 सह येऊ शकते.

रंग -

नवीन डिव्हाइस पोर्सिलीन आणि ऑब्सिडियन (काळा) या दोन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

स्टोरेज -

स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel Fold 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह येऊ शकतो. यात फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग फीचर मिळू शकते. तसेच, हे Android 13 ऑपरेटिंग सिस्टमसह येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT