Google AI Features Saam tv
लाईफस्टाईल

Google AI Tool Launch : Google चं भन्नाट AI टूल, भारतीयांसाठी हिंदी-इंग्रजीत सर्च करण्याची सुविधा

Indian Users Able To Based Google Search With AI : अल्फाबेटची कंपनी गुगलने भारत आणि जपानमधील वापरकर्त्यांसाठी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस सादर केले आहे.

कोमल दामुद्रे

Google AI Tool : हल्ली गुगलचा वापर प्रत्येक भारतीय करतो. सर्च इंजिनपासून ते विविध माहिती मिळवण्यासाठी आपण गुगलवर जाऊन सर्च करतो. सध्या वेगाने पसरत असलेल्या AI चा वापर गुगलने देखील केला आहे.

जगातील सगळ्यात मोठी आणि आघाडीची कंपनी Google ने भारतीय वापरकर्त्यांसाठी दोन नवीन फीचर लॉन्च केले आहे. अल्फाबेटची कंपनी गुगलने भारत आणि जपानमधील वापरकर्त्यांसाठी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस सादर केले आहे.

AI च्या मदतीतून गुगलने (Google) इंग्रजी आणि हिंदीमध्ये टूल सादर केले आहेत. याआधी ही सुविधा फक्त अमेरिकेत सुरु करण्यात आली होती. यामुळे गुगलचे सर्च इंजिन आधीसारखे सहज आणि स्मार्ट पद्धतीने होईल असे कंपनीने (Company) मत मांडले आहे.

ज्या वापरकर्त्यांना या फीचरच्या (Feature) मदतीने साइन अप करतात ते वापकर्ते क्रोम आणि गुगल अॅपवर अॅक्सेस करु शकतील. परंतु, गुगल सर्च इंजिन हे पूर्वीसारखेच असेल. जपानी युजर्स हे फीचर त्यांच्या भाषेत वापरु शकतात तर भारतात हे AI फीचर इंग्रजी आणि हिंदी भाषेत वापरु शकतात. हे फीचर चॅटबॉट बार्डपेक्षा वेगळे असेल ज्याच्या मदतीतून माणसासारखा संवाद साधू शकतात. यासाठी गुगल सॉफ्टेवर कोड तयार करु शकते. गुगलचा एआय शोध मायक्रोसॉफ्टच्या बिंगशी स्पर्धा करतो. Google चे AI शोध टूल आता भारतीय आणि जपानी वापरकर्त्यांना फायदा करुन देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT