Indian physicist and meteorologist Anna Mani's 104th Birthday doodle by Google
Indian physicist and meteorologist Anna Mani's 104th Birthday doodle by Google Google Doodle
लाईफस्टाईल

Anna Mani : अण्णा मणी कोण आहे ? गुगल डूडलवर त्यांचा वाढदिवस का साजरा केला जातोय?

कोमल दामुद्रे

Anna Mani : आज २३ ऑगस्ट गुगल डूडल देशातील पहिल्या महिला वैज्ञानिकांपैकी एक, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा १०४ वा वाढदिवस आज साजरा करत आहे.

त्यांच्या जीवनातील कार्य आणि संशोधनामुळे भारताला हवामानाचा अचूक अंदाज लावणे शक्य झाले आणि राष्ट्राला अक्षय ऊर्जेचा वापर करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.

२३ ऑगस्ट १९१८ साली मणी यांचा जन्म त्रावणकोर (केरळ) राज्यात झाला होता. त्यांना पुस्तक वाचायची आवड असल्यामुळे त्या सतत पुस्तक वाचण्यात गुंग असत. तसेच वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या सार्वजनित वाचनालयातील सर्व पुस्तक वाचली होती.

त्यांनी महिला ख्रिश्चन कॉलेज (WCC) मध्ये इंटरमिजिएट सायन्स कोर्स केला आणि प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास येथून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात ऑनर्ससह बॅचलर ऑफ सायन्स पूर्ण केले. पदवीनंतर, त्यांनी WCC मध्ये एक वर्ष शिकवले आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे पदव्युत्तर अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळविली. येथे, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी हिरे आणि माणिकांमध्ये विशेष स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास केला.

१९४२ आणि १९४५ दरम्यान, त्यांनी पाच शोधनिबंध प्रकाशित केले व पीएच.डी. पूर्ण केली. शोध प्रबंध, आणि इम्पीरियल कॉलेज, लंडन येथे पदवीधर कार्यक्रम सुरू केला, जिथे त्यांना हवामानशास्त्रीय उपकरणांमध्ये शिकण्यास मिळाले.

१९४८ मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी भारतीय हवामान विभागासाठी काम करण्याचे ठरवले. त्यांनी देशाला स्वत:ची हवामान उपकरणे डिझाइन आणि तयार करण्यास मदत केली. त्या वेळच्या पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांनी इतके प्रावीण्य मिळवले की, १९५३ पर्यंत त्या विभागाची प्रमुख बनल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, १०० हून अधिक हवामान उपकरणांचे डिझाईन्स उत्पादनासाठी (Product) सोपे आणि प्रमाणित केले गेले.

मणी हे पर्यायी उर्जा स्त्रोतांचे सुरुवातीचे समर्थक होते. १९५० च्या दशकात, त्यांनी सौर रेडिएशन मॉनिटरिंग स्टेशनचे नेटवर्क स्थापित केले आणि शाश्वत ऊर्जा मापनावर अनेक पेपर प्रकाशित केले.

मणी नंतर भारतीय (India) हवामान विभागाचे उपमहासंचालक बनल्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. १९८७ मध्ये, त्यांनी विज्ञानातील उल्लेखनीय योगदानासाठी INSA के.आर. रामनाथन पदक जिंकले.

निवृत्तीनंतर त्यांची बंगळुरू येथील रमण संशोधन संस्थेच्या विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौर आणि पवन ऊर्जा उपकरणे बनवणारी कंपनी देखील स्थापन केली.

अण्णा मणी, १०४ व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! तुमच्या जीवनातील कार्याने या जगाला उज्ज्वल दिवसांची प्रेरणा दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT