Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलं सतत रागराग-चिडचिड करतात? पालकांनो, या टिप्स फॉलो करा; मूड राहिल नेहमी आनंदी

How To Handel Your Child : किशोर वयात मुले आल्यानंतर त्यांना अधिक प्रश्न पडतात. त्यांचे वागणे-बोलणे बदलते. त्यामुळे पालकांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट त्यांच्यावर लगेच प्रभावी होते.

कोमल दामुद्रे

Good Parenting Tips :

वाढत्या वयात मुलांना अधिक गोष्टी समजू लागतात. चांगल्या वाईट गोष्टींचा त्यांचा शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. तसेच कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना मुलांसोबत अधिक वेळ घालवता येत नाही.

किशोर वयात मुले आल्यानंतर त्यांना अधिक प्रश्न पडतात. त्यांचे वागणे-बोलणे बदलते. त्यामुळे पालकांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट त्यांच्यावर लगेच प्रभावी होते. बरेचदा मुलांच्या वागण्यामुळे पालक (Parents) त्यांच्यावर रागवतात. त्यामुळे मुलं (Child) चुकीचे पाऊल उचलतात. वाढत्या वयात मुलांचा राग, चिडचिडपणा कसा हॅण्डल कराल जाणून घेऊया.

मुलांना शिस्त लावणे गरजेचे आहे. वाढत्या वयात मुलांना योग्य वळण लावल्यास ते मोठे झाल्यावर चुकणार नाही. ते कशाप्रकारे वागायचे, काय खायचे आणि कसे बोलायचे हे शिकवा.

मुलांच्या चुकीसाठी पालक नेहमीच त्यांना ओरडतात परंतु, बरेचदा पालकांची चुकी असताना ते ती स्वीकारत नाही. अशावेळी पालकांनी देखील मुलांची माफी मागायला हवी. यातून मुलांना चांगले शिकायला मिळते.

कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना मुलांसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकदा मुलांना पालकांचे प्रेम हवे असते. ते मिळाले नाही की, ते चिडचिड रागराग करतात. अशावेळी मुलांशी बोलण्यासाठी वेळ काढा, त्यांना तुमचे प्रेम (Love) द्या. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

प्रत्येक पालकांना असे वाटते की, आपल्या मुलाने यशस्वी व्हावे. अशावेळी त्यांना योग्य दिशा दाखवणे गरजेचे आहे. त्यांना सतत ओरडण्यापेक्षा प्रेमाने समजवा. ज्यामुळे मुलांचा मूड बदलेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thorat : अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Diabetes Fruits: डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खुशखबर! हे फळ खा, ब्लड शुगरची काळजी सोडा

Sanjay Raut : "संकटकाळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला..." संजय राऊतांचा भाजपावर ऐन दिवाळीत जळजळीत टीका

Health Tips : गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही? वाचा तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT