सध्या तरुणांना चांगल्या दर्जाचे कॅमेरे आणि बॅटरी असलेले फोन हवे असतात. लोक सोशल मीडियासाठी मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांना चांगले स्मार्टफोन हवे असतात. त्यातच Samsungने त्यांच्या ग्राहकांसाठी कमी बजेटमध्ये स्मार्टफोन लॉंच केले आहेत. त्यामधले फिचर, बॅटरी, कॅमेरा आणि त्याची किंमत याबद्दल पुढील बातमीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Samsung ने भारतात आपल्या लोकप्रिय गॅलेक्सी ए सिरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन – Samsung Galaxy A57 5G आणि Samsung Galaxy A37 5G – लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन्स विशेषतः तरुण वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आले असून फोटोग्राफी, परफॉर्मन्स आणि एआय फीचर्सवर भर देण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या या लॉन्चमध्ये कंपनीने या दोन्ही डिव्हाइसेसमध्ये प्रीमियम डिझाइन आणि टिकाऊपणाचा उत्तम संगम दिल्याचा दावा केला. गॅलेक्सी A57 5G हा केवळ ६.९ मिमी जाडीचा असून अॅल्युमिनियम फ्रेमसह येतो, ज्यामुळे तो ए सिरीजमधील सर्वात सडपातळ फोन ठरतो. यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट, व्हिजन बूस्टर आणि १९०० निट्स ब्राइटनेस असल्याने बाहेरही स्क्रीन स्पष्ट दिसते.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ आणि IP68 रेटिंग दिले असून पाणी आणि धुळीपासून संरक्षण मिळते. तसेच ६ अँड्रॉईड अपडेट्स आणि ६ वर्षांची सिक्युरिटी अपडेट्स मिळणार असल्याने हे फोन दीर्घकाळ वापरता येतील.
कॅमेरा बाबतीतही कंपनीने मोठी सुधारणा केली आहे. दोन्ही फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन आणि लो-लाईट फोटोग्राफीसाठी प्रगत तंत्रज्ञान देण्यात आले आहे. A57 5G मध्ये १२MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, तर A37 5G मध्ये ८MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. दोन्हीमध्ये ५MP मॅक्रो आणि १२MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
परफॉर्मन्ससाठी A57 5G मध्ये Exynos 1680 प्रोसेसर तर A37 5G मध्ये Exynos 1480 प्रोसेसर देण्यात आला आहे. LPDDR5X RAM आणि UFS 3.1 स्टोरेजमुळे जलद कामगिरी मिळते. A57 मध्ये मोठे वेपर कूलिंग चेंबर दिले असल्याने गेमिंगदरम्यान फोन थंड राहतो.
या दोन्ही फोनमध्ये ५०००mAh बॅटरी असून ४५W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीच्या मते, फोन सुमारे ३० मिनिटांत ६० टक्के चार्ज होऊ शकतो आणि जवळपास दोन दिवस बॅटरी टिकू शकते.
हे स्मार्टफोन्स One UI 8.5 वर चालतात, ज्यामध्ये एआय फीचर्स जसे की सर्कल टू सर्च, वॉईस ट्रान्स्क्रिप्शन आणि रिअल-टाइम कॉल ट्रान्स्क्रिप्शन दिले आहेत. याशिवाय Samsung Knox Vault मुळे डेटा जास्त सुरक्षित राहतो.
किंमतीबाबत बोलायचे झाले तर , Galaxy A57 5G च्या ८GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत ५६,९९९ रुपये असून १२GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत ६२,४९९ रुपये आहे. Galaxy A37 5G चा ८GB + १२८GB व्हेरिएंट ४१,९९९ रुपयांत, ८GB + २५६GB व्हेरिएंट ४७,४९९ रुपयांत आणि १२GB + २५६GB टॉप व्हेरिएंट ५२,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन्स रिटेल स्टोअर्स, सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील. ग्राहकांना ३००० रुपयांचा कॅशबॅक, नो-कॉस्ट EMI किंवा अपग्रेड बोनस अशा आकर्षक ऑफर्सचा लाभही घेता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.