Gold Silver Price Today (16 Aug) Saam Tv
लाईफस्टाईल

Gold Silver Rate Today (16 Aug) : खुशखबर! सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदीला ब्रेक, पाहा 10 ग्रॅम सोन्याची किंमत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gold Silver Rate on 16 August 2023 in Maharashtra:

तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर हीच योग्य वेळ आहे. सध्या सोने बऱ्यापैकी स्वस्त झाले आहे. आज, बुधवारी (16 ऑगस्ट) सोन्याच्या दरात कमालीची घसरण नोंदवण्यात आली आहे. Bankbazar.com च्या वृत्तानुसार, आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी घट झाली आहे, तर चांदीचे भाव स्थिर आहेत. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,550 रुपये आहे. आदल्या दिवशी हा भाव 54,650 रुपये होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,510 रुपये आहे. आदल्या दिवशी ही किंमत 59,620 रुपये होती.

सराफा व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी सांगितले की, सोन्याच्या (Gold) दरात घसरण आणि चांदीच्या दरात स्थिरता आली आहे. आज चांदीच्या प्रति किलो दरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. आज चांदी 76,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल (मंगळवार) सायंकाळपर्यंत 76 हजार रुपये दराने चांदीची विक्री झाली आहे.

सोन्याचा भाव स्थिर

प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 100 ची घट झाली आहे. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम काल संध्याकाळी 56,000 रुपयांना विकले गेले. आज त्याची किंमत (Price) 55,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच किंमतीत 100 रुपयांची घसरण दिसून आली आहे. दुसरीकडे, मंगळवारी लोकांनी 24 कॅरेट सोने 58,800 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने खरेदी केले, आजही त्याची किंमत 58,700 रुपये आहे. म्हणजेच त्याच्या किंमतीत 100 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.

चांदीचा भाव

चांदीचा दर कालच्या तुलनेत 3,40 प्रति ग्रॅमने घसरला आहे. एक ग्रॅम चांदीची किंमत 72.80 रुपये आहे. तर आठ ग्रॅम चांदीची किंमत 582.40 आहे. 10 ग्रॅम चांदी 728 रुपये तर 100 ग्रॅम चांदीची (Silver) किमत 7280 रुपये आहे. अहमदाबाद ,दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईत चांदीच्या किंमती सारख्याच आहे. चांदीची किंमत 728 रुपये आहे. तर बंगळूरुमध्ये 715 रुपये किंमत आहे. चैन्नई, हैदराबादमध्ये 760 रुपये भाव आहे.

सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर गुणवत्तेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हॉलमार्क पाहूनच दागिने खरेदी करा. ही सोन्याची सरकारी हमी आहे. तुम्हाला सांगतो, भारतातील एकमेव एजन्सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. प्रत्येक कॅरेटचा हॉल मार्क नंबर वेगवेगळा असतो. तुम्ही ते पाहून आणि समजून घेऊनच सोने खरेदी करा.

जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24K सोने विलासी असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT