Gym mistakes kidney damage saam tv
लाईफस्टाईल

Workout mistakes: जीममध्ये अतिप्रमाणात व्यायाम धोकादायक! वर्कआऊट करताना 'या' चुका तुमची किडनी करतायत खराब

Gym mistakes kidney damage: शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि स्नायूंच्या वाढीसाठी जिममध्ये व्यायाम करणे अत्यंत फायदेशीर आहे. पण, अनेकदा व्यायामादरम्यान कळत-नकळत काही चुका केल्या जातात, ज्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • अति व्यायामामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते.

  • रबडोमायोलिसिसमुळे स्नायू पेशी तुटतात.

  • स्नायू प्रोटीन रक्तात मिसळल्याने किडनीवर ताण येतो.

सध्याच्या काळात हृदयविकार, स्ट्रोक, किडनी फेल होणं आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार तरुणांमध्ये वेगाने वाढताना दिसतायत. यापासून बचावासाठी अनेकजण व्यायामाकडे वळले आहेत. पण काही लोकं गरजेपेक्षा जास्त वर्कआउट करून शरीराचं नुकसान करून घेतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अति व्यायामामुळे किडनीवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे.

अति व्यायामामुळे किडनी खराब होते का?

डॉ. किशोर यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीराच्या क्षमतेनुसारच व्यायाम केला पाहिजे. गरजेपेक्षा जास्त वर्कआउट केल्यास शरीरातील स्नायू पेशी तुटतात आणि त्यातून एक विशिष्ट पदार्थ रक्तात मिसळतो. या स्थितीला ‘रबडोमायोलिसिस’ (Rhabdomyolysis) असं म्हणतात. ही स्थिती किडनी फेल होण्यामागचं एक प्रमुख कारण ठरू शकते.

रबडोमायोलिसिसमुळे किडनी कशी डॅमेज होते?

शरीराला विश्रांती न देता दीर्घकाळ व्यायाम करत राहिल्यास स्नायूंना इजा होते. या इजेमुळे स्नायूंमधील प्रोटीन रक्तात मिसळतं आणि हे प्रोटीन किडनीसाठी अत्यंत घातक ठरतं. त्यामुळे किडनीवर ताण येतो आणि हळूहळू तिचं कार्य कमी होऊ लागतं. ही स्थिती गंभीर असून वेळेवर उपचार न मिळाल्यास किडनी फेल होण्याचा धोका वाढतो.

रबडोमायोलिसिस म्हणजे नेमकं काय?

रबडोमायोलिसिस ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. यात स्नायूंचे टिश्यू (muscle tissue) कमकुवत होतात आणि त्यातील प्रोटीन रक्तप्रवाहात मिसळतं. हे प्रोटीन लघवीवाटे बाहेर टाकलं जातं पण किडनीवर याचा ताण येतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाची किडनी पूर्णपणे निकामी होऊ शकते.

रबडोमायोलिसिस होण्याची कारणं

रबडोमायोलिसिससाठी अनेक कारणं जबाबदार असतात. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे एका वेळेस खूप जास्त व्यायाम करणं. विशेषतः ज्यावेळी एखादा नवीन व्यक्ती कोणत्याही गाइडन्सशिवाय हेवी वर्कआउट करतो तेव्हा मांसपेशींवर ताण येतो आणि त्या तुटण्याची शक्यता वाढते.

रबडोमायोलिसिसपासून बचाव कसा करावा?

या आजारापासून बचाव करण्यासाठी व्यायाम योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात करणं आवश्यक आहे-

  • व्यायाम करताना शरीराच्या क्षमतेनुसारच वर्कआउट करा

  • कोणत्याही एक्सपर्टच्या मार्गदर्शनाशिवाय हेवी व्यायाम सुरू करू नका

  • शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे

  • सतत व्यायाम न करता दरम्यान विश्रांती घ्या

  • फार गरम हवामानात व्यायाम टाळा

  • मांसपेशींमध्ये वेदना किंवा लघवी गडद झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या

दिवसभरात किती वेळ व्यायाम करावा?

डॉक्टरांच्या मते, निरोगी राहण्यासाठी दररोज ३० मिनिटं व्यायाम करणं पुरेसं असतं. वजन कमी करत असाल तर १ तासापर्यंत व्यायाम करता येतो. मात्र हे करताना व्यायामतज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. नवीन वर्कआउट सुरू करताना लगेचच जड व्यायाम करू नका. वर्कआउटपूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्या.

अति व्यायामामुळे किडनीवर काय परिणाम होतो?

अति व्यायामामुळे स्नायू पेशी तुटतात आणि त्यातील प्रोटीन रक्तात मिसळते, ज्यामुळे किडनीवर ताण येऊन ती निकामी होण्याचा धोका असतो.

रबडोमायोलिसिस म्हणजे काय?

रबडोमायोलिसिस म्हणजे स्नायू टिश्यूजचे नुकसान होऊन त्यातील प्रोटीन रक्तात मिसळणे, जे किडनीसाठी घातक ठरते.

रबडोमायोलिसिस होण्याचे मुख्य कारण काय आहे?

एकाच वेळी अत्यधिक व्यायाम करणे, विशेषतः गाइडन्सशिवाय हेवी वर्कआउट करणे हे रबडोमायोलिसिसचे मुख्य कारण आहे.

रबडोमायोलिसिसपासून कसा बचाव करावा?

शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करा, एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम सुरू करा, हायड्रेशन राखा आणि विश्रांती घ्या.

दररोज किती वेळ व्यायाम करावा?

निरोगी राहण्यासाठी दररोज ३० मिनिटे व्यायाम पुरेसा आहे. वजन कमी करण्यासाठी १ तासापर्यंत करता येतो, पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला भगिनींनी बांधली राखी

Mumbai News: निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल, मुंबईत रास्तारोको आंदोलन|VIDEO

Electric Shock : तारेवरचे कपडे काढताना अनर्थ घडला; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT