smartphone side effects on child mental health saam tv
लाईफस्टाईल

Screen time impact: लहान वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन देणं ठरतंय घातक; तरूणपणात करावा लागतोय मानसिक आरोग्याशी संघर्ष

smartphone side effects on child mental health: आजच्या डिजिटल युगात लहान मुलांना अगदी कमी वयातच स्मार्टफोन देणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी किंवा ऑनलाइन शिक्षणासाठी पालक त्यांना गॅजेट्स देतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल अनेक लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅब पाहायला मिळतो. आपलं मूल सध्याच्या युगात मागे राहू नये म्हणून अगदी ५-६ वर्षांच्या मुलांना देखील पालक स्मार्टफोन घेऊन देतात. जर तुम्हाला वाटत असेल की, मुलाला लहान वयात स्मार्टफोन किंवा टॅबलेट देणं त्याला डिजिटल जगात फायदेशीर आहे, तर तुमचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे.

एका धक्कादायक सर्वेक्षणानुसार, जितक्या लवकर मुलाला स्मार्टफोन दिला जातो तितक्या जास्त प्रमाणात त्याला तरुण वयात मानसिक आरोग्याच्या समस्या भोगाव्या लागू शकतात.

या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, स्मार्टफोन मिळण्याचं वय जितकं कमी, तितके मानसिक आरोग्याची स्थिती खालावली जाऊ शकते. लहान वयात स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुणांनी आत्महत्येचे विचार, इतरांबद्दल आक्रमकता, मनात विचित्र भावना येणं आणि भास यांसारख्या समस्या येत असल्याचं सांगितलं हे. हे संशोधन अमेरिकन संस्था Sapien Labs ने 40 हून अधिक देशांमध्ये केलंय.

या जागतिक अभ्यासात 18 ते 24 वयोगटातील 27,969 तरुणांचा डेटा गोळा करण्यात आला. यामध्ये सुमारे 4,000 भारतीयांचाही समावेश होता. समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांवर याचा परिणाम अधिक दिसून आला.

महिलांवर याचा कसा परिणाम झाला?

ज्या महिलांना वयाच्या 6 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन मिळाला त्यापैकी 74% जणींना तरुण वयात गंभीर मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवल्या होत्या. हेच प्रमाण वयाच्या 10 व्या वर्षी स्मार्टफोन मिळालेल्या महिलांमध्ये 61% आणि 15 व्या वर्षी मिळालेल्या महिलांमध्ये 52% होतं. वयाच्या 18 व्या वर्षी स्मार्टफोन मिळालेल्यांमध्ये हे प्रमाण 46% होते.

पुरुषांवर याचा परिणाम कसा दिसून येतो?

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचा परिणाम कमी दिसून आला. वयाच्या 6 व्या वर्षी स्मार्टफोन मिळालेल्या 42% पुरुष मानसिकदृष्ट्या त्रस्त होते. तर वयाच्या 18 व्या वर्षी स्मार्टफोन मिळालेल्यांमध्ये हे प्रमाण 36% होते.

या स्टडीचं नाव “Age of first smartphone and mental wellbeing outcome” असून, यात मानसिक आरोग्याची विविध लक्षणं आणि क्षमता तपासून एकत्रित Mental Health Quotient (MHQ) तयार करण्यात आला. त्यानंतर याची तुलना स्मार्टफोन किंवा टॅबलेट मिळण्याच्या वयाशी करण्यात आली.

Sapien Labsच्या संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक न्यूरोसायंटिस्ट तारा थिआगराजन यांनी सांगितलं की, लहान वयात फोन मिळणं म्हणजे प्रौढ वयात अधिक मानसिक समस्या – विशेषतः आत्महत्येचे विचार, आक्रमकता. मुलं दररोज 5 ते 8 तास ऑनलाइन घालवतात म्हणजे वर्षाला 2,950 तास ते ऑनलाईनवर असतात. स्मार्टफोनपूर्वी हा वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवला जायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - चिपळूण खेर्डी MIDC मधील थ्री एम पेपर मिल कंपनीला भीषण आग

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव भासतेय? जाहीर सभेत म्हणाले...; पाहा VIDEO

Mumbai Fire : मुंबईत इमारतीला भीषण आग; ६ जण होरपळले

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदी बात', पॉश एरियात वेश्याव्यवसाय; महिलेसह ११ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

महाराष्ट्रातील या गावात शिवी दिल्यास आकारला जातो दंड? काय आहे नियम वाचा

SCROLL FOR NEXT