Relationship Saam TV
लाईफस्टाईल

Relationship : गर्लफ्रेंडबद्दल तुमच्या मनातही संशय आहे; सोप्या ट्रिक्सने सत्य येईल समोर

Relationship News : गर्लफ्रेंड आपल्यावर खरोखर प्रेम करते का? तिच्या आयुष्यात आणखी कोणी मुलगा आहे का? असे विचार मुंलाच्या मनात येत असतात. आता तुमच्या मनात सुद्धा असे विचार येत असतील

साम टिव्ही ब्युरो

काळानुसार आणि स्वभावानुसार प्रत्येक व्यक्तीची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. प्रेमात दोघांनी देखील प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. प्रत्येक रिलेशनमध्ये मुलं आपल्या पत्नीसाठी किंवा गर्लफ्रेंडसाठी खूप जास्त पजेसीव असतात. त्यामुळे आपली गर्लफ्रेंड आपल्यावर खरोखर प्रेम करते का? तिच्या आयुष्यात आणखी कोणी मुलगा आहे का? असे विचार मुंलाच्या मनात येत असतात. आता तुमच्या मनात सुद्धा असे विचार येत असतील तर काही ट्रिक्समधून आम्ही तुम्हाला सत्य कसं ओळखायचं याची माहिती देणार आहोत.

गोष्टी लपवणे

जी मुलगी आपल्या प्रियकरावर जीवापाड प्रेम करते ती त्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असते. शुल्लक गोष्टींपासून ते मोठ-मोठे प्रसंग देखील मुली आपल्या पार्टनरला शेअर करतात. आता तुमची गर्लफ्रेंड सुद्धा तुम्हाला सर्व शेअर करते का ते तपासा. जर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयुष्यातील डेली रुटीनमधील काही गोष्टी ती तुमच्यापासून लपवत असेल तर समजून जा तुमची गर्लफ्रेंड तुमच्याबद्दल लॉयल नाही. किंवा तिच्या मनात काही वेगळ्या गोष्टी सुरू आहेत.

पर्सनल स्पेस

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्वताची एक पर्सनल लाईफ असते. मग गर्लफ्रेंड असो किंवा बॉयफ्रेंड प्रत्येक जण एकमेकांपासून दूर काही वेळासाठी पर्सनल स्पेस घेतात. आता तुमची गर्लफ्रेंड तुमच्यापासून जास्त वेळ दूर राहते, तिला गरजेपेक्षा जास्त पर्सनल स्पेस हवी असेल तर याचा अर्थ तिला तुमच्यापासून दूर जायचे आहे. तिच्या मनात तुमच्याबद्दल जास्त प्रेम उरलेलं नाही हे समजून जा.

दुसऱ्यांशी तुलना करणे

ज्या व्यक्तीला आपण आवडत नाही ती व्यक्ती सतत आपल्यामधील चूका शोधत असते. तुमची प्रेयसी जर तुम्हाला सतत ओरडत असेल आणि तुमची तुलना इतरांशी करत असेल तर याचा अर्थ तिला तुम्ही जास्त आवडत नाही. तिला तुमच्यापासून दूर जावे वाटते. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मुलीच्या तुमच्या प्रेयसीच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते ओळखू शकता.

खोटं बोलणे

आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती कायम आपल्याशी खरं बोलते. आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही. तुमची प्रेयसी तुमच्यापासून गोष्टी लपवत असेल, अर्ध सत्य आणि खोटी माहिती सांगत असेल तर तिच्या मनातील सर्व गोष्टी स्पष्ट शब्दांत तिला विचारून घ्या. त्यानुसार पुढे प्रेयसीसोबत वागा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT