Ghee Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Ghee Benefits : ग्लोइंग स्किन आणि बरंच काही...; एक चमचा तूप पिण्याचे जबरदस्त फायदे

Ghee Benefits For Body : रोज एक चमचा तुपाचे सेवन केल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तूप खाल्लं की रूप येतं अशी एक म्हण आहे. ही म्हण तुम्ही कधी ना कधी ऐकलीच असेल. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यासह अनेक शारीरिक समस्या दूर होतात. त्यामुळेच आज तूप खाण्याचे फायदे काय काय आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

अनुशापोटी सेवन करा

सकाळी आपल्या शरीराला एनर्जीची फार गरज असते. त्यामुळे तुम्ही अनुशापोटी तुपाचे सेवन करू शकता. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. पाणी थोडे कोमट करून घ्या. कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करा. त्यानंतर तुपाचे पाणी पिऊन घ्या. हे पाणी तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर प्यायचे आहे.

पचन समस्या

पचनाशी निगडित समस्या असल्यास अनेक व्यक्ती सकाळी कोमट पाणी पितात. फक्त कोमट पाणी पिऊन शरीराला हवे तसे फायदे मिळत नाहीत. त्यामुळे पाण्यामध्ये तूप मिक्स करून प्यायले पाहिजे. तुपातील गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते.

मेटाबॉलिज्म वाढते

शरीरातील फॅट कमी करण्यासाठी तूप फायदेशीर आहे. याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. तसेच मेटाबॉलिज्म वाढण्यासाठी मदत होते.

हाडे लवचिकाने मजबूत

अनेक वयोवृद्ध व्यक्तींना हडांशी संबंधित समस्या असतात. वयाच्या साठीनंतर गुडघे दुखणे, पायांच्या टाचा दुखणे यासह महिलांना कंबर दुखीच्या समस्या जाणवतात. तुपामध्ये विटामिन डी आणि कॅल्शियम असते. याने हाडांना लवचिकता प्राप्त होते. तसेच ठिसूळ आणि कमजोर झालेली हाडे बळकट होतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती फार कमी असते. तसेच अनेक व्यक्ती विविध आजाराने पीडित असल्यास त्यांच्यातही रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. स्वतःच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. बहुसंख्या व्यक्ति तेलात बनवलेले पदार्थ खातात. त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी तुपाचे सेवन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT