SBI बँकेच्या कार्डने सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन अनेक ऑफर सुरू केल्या आहेत. या ऑफर कंपनीच्याच क्रेडिट कार्डवर उपलबध्द आहेत. या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही सणासुदीच्या काळात खरेदीवर भरपूर पैसे (Money) वाचवू शकता.
कंपनीने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, या ऑफरचा (Offer) लाभ 2200 ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांना घेता येईल. टियर 2 आणि टियर 3 व्यापाऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोणत्या प्रोडक्ट्सवर सूट मिळेल?
ग्राहकांना अनेक कॅटेगेरीच्या प्रोडक्ट्सवर सूट दिली जात आहे. यामध्ये मोबाईल (Mobile), लॅपटॉप, फॅशन, फर्निचर, ज्वेलरी आणि किराणा सामानाचा समावेश आहे. त्याच वेळी, जर एखाद्या ग्राहकाने एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी ईएमआय पर्याय निवडला तर त्याला कंपनीकडून अनेक ऑफर दिल्या जात आहेत.
सणासुदीच्या ऑफर अंतर्गत या कंपन्यांच्या प्रोडक्टवर 27 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. SBI कार्ड Flipkart, Amazon, Myntra, Reliance Retail, Westside, Pantaloon, Max, Tanishq आणि TBZ च्या उत्पादनांवर 27.5 टक्के कॅशबॅक आणि झटपट सूट देत आहे.
तर, ग्राहकोपयोगी वस्तू, मोबाइल आणि लॅपटॉप विभागातील आघाडीच्या ब्रँडवर SBI कार्डच्या EMI-केंद्रित ऑफर उपलब्ध आहेत. यामध्ये Samsung, LG, Sony, Oppo, Vivo, Panasonic, Whirlpool, Bosch, IFB, HP आणि Dell आणि इतर अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.
तुम्ही या ऑफर्सचा लाभ कधी घेऊ शकता?
SBI कार्डने दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरपर्यंत या ऑफर्सचा लाभ घेता येईल. अशा स्थितीत, जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही शॉपिंगवर या ऑफरचा फायदा घेऊन पैसे वाचवू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.