Holi 2025 freepik
लाईफस्टाईल

Holi 2025: होळीच्या रंगांमधून मिळवा 'या' आजारांपासून मुक्ती, जाणून घ्या रंग थेरपी म्हणजे काय?

Holi colour 2024: क्रोमोथेरपी किंवा रंग चिकित्सा ही एक पद्धत आहे, ज्यामध्ये विविध रंगांचा वापर करून मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम साधला जातो.

Dhanshri Shintre

होळी हा रंगांचा सण केवळ आनंद आणि उत्सवासाठीच नव्हे, तर त्यामागे वैज्ञानिक कारणेही दडलेली आहेत. या सणात लोक आपल्या प्रियजनांना आणि मित्रांना रंग लावून शुभेच्छा देतात आणि उत्साहात होळी साजरी करतात. रंगांचा वापर हा केवळ धर्म किंवा मजा करण्यापुरता मर्यादित नसून त्याला 'रंग चिकित्सा' (क्रोमोथेरपी) असेही म्हणतात. रंगांशी खेळल्याने मनःस्थिती, ऊर्जा पातळी आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. होळीच्या रंगांनी मनात आनंद, सकारात्मकता आणि ऊर्जा निर्माण होते. यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यास फायदे मिळतात. या लेखात होळीतील रंगांचे वैज्ञानिक महत्त्व आणि रंग चिकित्सेचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.

रंग थेरपी कसे कार्य करते?

रंग थेरपीत रंगांच्या माध्यमातून शरीरातील विविध घटकांचे संतुलन साधले जाते. एखादा रंग पाहिल्यावर त्या रंगाच्या लहरी मेंदूपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे भावना आणि शरीर सकारात्मक प्रतिक्रिया देतात. या प्रक्रियेत रंगांचा प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करतो.

Red Colour

रंग थेरपीचे फायदे

लाल रंग

लाल रंग ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवतो. हा रंग उत्साह, धैर्य वाढवून रक्ताभिसरण सुधारतो आणि थकवा कमी करतो. मात्र, जास्त लाल रंगामुळे राग आणि आक्रमकता वाढू शकते, त्यामुळे त्याचा संतुलित वापर करणे महत्त्वाचे आहे.

Yellow Colour

पिवळा रंग

पिवळा रंग सकारात्मकता आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. तो आनंद, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवतो. पचनसंस्था मजबूत करतो आणि एकाग्रता सुधारतो. मानसिक नैराश्य आणि ताण कमी करण्यास हा रंग उपयुक्त ठरतो.

Green Colour

हिरवा रंग

हिरवा रंग आंतरिक शांती आणि संतुलन कायम ठेवतो. हा रंग हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारतो. निसर्गाशी जोडलेला हिरवा रंग ताण कमी करण्यात आणि मनाला शांती देण्यात मदत करतो.

Blue Colour

निळा रंग

निळा रंग शांती आणि शीतलतेचे प्रतीक आहे. तो तणाव कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारतो. तसेच, निळा रंग रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो, त्यामुळे तो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT