Gatari Amavasya Saam Tv
लाईफस्टाईल

Gatari Amavasya 2025: श्रावणाआधी गटारी का साजरी करतात? कारण जाणून व्हाल थक्क

गटारी अमावस्या ही श्रावण सुरू होण्यापूर्वी साजरी केली जाते. या दिवशी मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात. ही परंपरा धार्मिक आणि आरोग्यविषयक कारणांनी पाळली जाते.

Manasvi Choudhary

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी सर्वजण मासांहरी पदार्थांचे मनसोक्त सेवन करतात. श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी साजरी करण्याची पद्धत आहे. गटारी म्हटलं की मस्त मासांहरी विविध पदार्थावर ताव मारण्याचा दिवस. यावर्षी २५ जुलै २०२५ म्हणजेच शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे त्याआधी येणाऱ्या अमावस्येला गटारी साजरी केली जाते. यावर्षी गटारी अमावस्या २४ जुलै रोजी असणार आहे मात्र या दिवशी गुरूवार असल्याने बुधवारी गटारी साजरी केली जाईल.

गटारी का साजरी करतात

श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. या संपूर्ण महिन्यात देवाची भक्ती केली जाते. या महिन्यात मासांहरी खाणे टाळले जाते. यामुळेच गटारी अमावस्येला मासांहरी पदार्थाचे सेवन केले जाते.

गटारी हे नाव कसं पडलं?

गटारी अमावस्या आपण ज्याला बोलतो त्याचे मूळ नाव गतहारी अमावस्या असे आहे. गतहारी हा शब्द संस्कृत गत आणि आहार या शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो. वैदीक शास्त्रानुसार, श्रावण महिना पावसाचा असतो या काळात रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते तसेच या दिवसात पचनक्रिया देखील मंदावते त्यामुळे या दिवसात मासांहर खाणे टाळले जाते.

गटारी अमावस्या पूजा

हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्व आहे. अमावस्या तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला गटारी अमावस्या असे म्हटंले जाते. या दिवशी दीप पूजन करण्याची पद्धत आहे. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या गटारी अमावस्येला दिवे लावून देवांची पूजा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT