मसाल्यांमध्ये वापरला जाणारा लसूण वैद्यकिय उपचारांसाठी देखील फार गुणकारी आहे. आयुर्वेदात अनेक आजारांसाठी लसूण वापरला जातो. उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणून देखील लसूण दिला जातो. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि इन्फेक्शन होण्यापासून वाचवतात. याव्यतिरिक्त लसणाचे तेल हाडे व सांधे दुखीवर रामबाण उपाय आहे.
आजकाल वयोवृद्धांसह तरूणांना देखील हाडे आणि सांधे दुखीच्या समस्या उद्भवत आहेत. हाडे दुखीची अनेक कारणे आहेत. धावपळीच्या जीवनात योग्य आणि पुरेसा आहार न घेतल्याने शरीराला पोषक तत्त्वांची कमी भासते. यामुळे योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळत नाही आणि हाडे दुखु लागतात. काहीजणांना संधिवातामुळेही हाडांमध्ये वेदना जाणवतात. शिवाय व्हिटॅमिन डीची कमतरताही हाडे दुखीचे कारण ठरू शकते.
लसूण तेलामध्ये डायसल्फाइड सारखे घटक असतात. जे हाडांची झीज होण्यापासून रोखतात आणि हाडांना मजबूती देतात. सांधे दुखत असतील तर, लसूण तेलाचा वापर केल्याने सांध्यांना जळजळ आणि वेदनेपासुन आराम मिळतो. यामुळे ऑस्टियोआर्थरायटि सारख्या आजारांचा धोका टळतो. लसणाचे अँटीऑक्सिडंट् गुणधर्म मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून हाडांचे संरक्षण करतात. शिवाय लसूण हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. जे हाडांना निरोगी ठेवतं.
लसणाचे तेल कसे बनवायचे ?
१. लसणाच्या ७-८ पाकळ्या सोलून, बारीक कापून घ्या.
२. एका भांड्यात किंवा लोखंडाच्या कढईत राईचे तेल गरम करा.
३. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक कापलेले लसूण घाला.
४. तेल २-३ मिनिटे उकळवून घ्या. थंड झाल्यावर एका बाटलीत भरून ठेवा.
लक्षात ठेवा : तेल लावण्याधी हलके गरम करून घ्या.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.