Gardening Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Ginger Growing Tips : बाल्कनीत छोट्या कुंडीत लावा अदरक अन् रोज प्या गरमागरम आयुर्वेदिक चहा, आजार जातील पळून

Ginger Health Benefits : पावसाळ्यात गरमागरम चहा प्यायला सर्वांना आवडते. थंडगार हवेत वाफाळलेला चहा शरीराला ऊर्जा देतो. बाल्कनीत छोट्या कुंडीत आलं कस लावाव जाणून घ्या.

Shreya Maskar

गेले काही दिवस आपल्याकडे मुसळधार पाऊस पडतोय. पाऊस म्हटलं की, गरम भजी आणि चहा चा बेस्ट ऑपशन आला. त्यात जर आलं टाकून केलेला चहा म्हणजे वेगळच सुखं. उन्हाळा असो वा कडाक्याची थंडी आल्याचा चहा म्हणजे स्वर्गसुखच. पण हाच चहा तुमच्या अंगणात लावता आला तर, रोज घरबसल्या आल्याचा गरमागरम चहा पिता येईल.

आलं खाण्याचे फायदे

  • आल्यामध्ये व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, लोह मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत करते.

  • कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी नियमित आल्याचा रस प्यावा.

  • वाढत्या ताणामुळे आजकाल अनेकांना मायग्रेनचा त्रास होत आहे. यामुळे डोके दुखायला लागल्यावर आलं चघळावं.

  • पावसाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असते. अशात नियमित सकाळी एक तुकडा आल्याचा खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो.

  • ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

  • उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी आल्यासा रस प्यावा. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

आले कुंडीत कसे लावायचे?

आलं कुंडीत लावण्यासाठी थोडा जुना किंवा सुकलेला आल्याचा तुकडा वापरावा. कारण जुन्या आल्यामध्ये असलेले कोंब झाड उगवण्यास मदत करतात. घरी कुंडीत आले लावताना वापरणारी माती ही सुकी असावी. त्यात जास्त पाणी नसावे. जेणेकरून ती चिकट होणार नाही. कुंडीमध्ये माती टाकून त्यामध्ये थोडा खड्डा करून आल्याचा तुकडा त्यात टाकावा. असे करताना आल्यांचे कोंब वरच्या बाजूला असतील याची काळजी घ्या. कारण रोपाच्या वाढीसाठी ते महत्त्वाचे आहे. हे रोपटे सूर्यप्रकाशात ठेवावे आणि माती सुकल्यावरच त्यामध्ये पाणी टाकावे. साधारण एका महिन्याने कुंडीत पानं आलेली दिसतील. तीन ते चार महिन्यांनंतर पानं पिवळट झाल्यावर आलं काढून घ्यावे. आलं मातीतून काढताना रोपाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. एकदा लावलेल्या रोपट्याची नीट काळजी घेतल्यास ते कायम वाढत राहते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

SCROLL FOR NEXT