ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शेपू 1 मोठी जुडी, मूगडाळ अर्धा कप, कांदा 1 मध्यम (बारीक चिरलेला) हिरवी मिरची, लसून, हळद , हिंग, मीठ चवीनुसार, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता फोडणीसाठी इ.
मूगडाळ स्वच्छ तीन वेळा धुवून 1 कप पाण्यात भिजत ठेवा. १ तासानी मूगडाळमधील पाणी काढून टाका.
शेपू स्वच्छ धुऊन त्यातील घाण बाजूला काढून शेपू बारीक चिरून घ्या. शेपू लवकर शिजतो म्हणून जास्त वेळ परतायची गरज नाही.
कढईत तेल गरम करून लसून, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाका. नंतर कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. मग हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ टाका.
आता चिरलेला शेपू तयार केलेल्या फोडणीत घालून 3 ते 4 मिनिटे एकजीव होईपर्यंत परतवून घ्या. शेपूचा खास सुगंध निघेपर्यंत परतणे महत्त्वाचे आहे.
मूगडाळ कढईत घालून सर्व मिश्रण एकत्र करा. भाजी कढईच्या बुडाला लागू नये म्हणून हवे असल्यास थोडे पाणी घालून आमटीसारखा घट्टपणा ठेवा.
गॅस कमी करून 5ते 6 मिनिटे भाजी शिजवून द्या, जेणेकरून शेपूचा स्वाद डाळीत व्यवस्थित मुरेल.
गरमागरम शेपू–मूगाच्या डाळीची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही भात, चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागेल.