Turdal Amati Recipe : झटपट बनवा तुरीच्या डाळीची मसालेदार आमटी, जाणून घ्या रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुरीच्या डाळीची आमटी

रोजरोज साधं वरण, भाजी खाऊन कंटाळला असाल तर भात किंवा भाकरी, चपाती सोबत फोडणीची स्वादिष्ट आमटी नक्कीच बनवा .रोजच्या जेवणातील अगदी परफेक्ट डिश बनेल. घरातल्या साध्या साहित्यापासून बनणारी ही आमटी अप्रतिम लागते.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

साहित्य

तूरडाळ 1 कप, हळद, मीठ चवीनुसार, तेल, १ टेबलस्पून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर

Turichya Dalichi Amati | GOOGLE

डाळ शिजवून घ्या

तूरडाळ स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये हळद आणि पाणी घालून 3 ते 4 कूकरच्या शिट्ट्या घेऊन डाळ छान मऊ शिजवून घ्या.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

फोडणी तयार करा

एक कढई घ्या त्या कढईमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून फोडणी द्या.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

आमटीत मसाले घाला

आता लाल तिखट, गरम मसाला आणि हळद फोडणीत  घालून 10 ते 15 सेकंद परतवून घ्या.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

शिजवलेली डाळ मिसळा

कुकर गार झाल्यावर उकडलेली डाळ रवीने बारीक करुन कढईत तयार केलेल्या फोडणीत ओता आणि छान एकजीव करून ढवळून घ्या. त्यात तुम्हाला हवे तितके पाणी घालून आमटीची कंसिस्टन्सी तयार करा.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

मीठ चवीनुसार

चवीनुसार आमटीत मीठ टाका. तुम्हाला आंबट गोडपणा हवा असल्यास गुळ किंवा चिंचेचा रस सुद्धा चाविकरिता टाकू शकता.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

उकळी देऊन शिजवा

आता आमटीला मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटे उकळी येऊ द्या. उकळी आल्या नंतर वरून कोथिंबीर टाका.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

सर्व्ह करा

गरमागरम फोडणीची आमटी भात, चपाती किंवा भाज्यांसोबत सर्व्ह करा आणि खाण्याचा आस्वाद घ्या.

Turichya Dalichi Amati | GOOGLE

Gul Chinch Chutney Recipe : गुळ चिंचेची आंबट गोड चटणी, एकदा करुन बघाच

Gul Chinch Chutney | GOOGLE
येथे क्लिक करा