Ganeshotsav 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पाला 21 मोदकांचाच नैवेद्य का देतात? वाचा या मागची रंजक कथा

21 Modak for Prasad : गणपती बाप्पाला प्रसादामध्ये फक्त मोदक का आवडतात. तसेच प्रसादाच्या थाळीत २१ मोदकच का असतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी बाप्पा विराजमान होताना दिसत आहे. कालच मुंबईच्या लालबागच्या राजाचे आगमन झाले. गणपती बाप्पा घरी आल्यावर त्याच्या सेवेत घरातील सर्व मंडळी कामाला लागतात. नैवेद्य बनवणे, डेकोरेशन आणि प्रसाद अशी सर्व लगबग सुरू असते. गणपती बाप्पासह घरात प्रत्येक व्यक्तीला मोदक आवडतात.

गणपती बाप्पाला नेहमी 21 मोदकांचा नैवेद्य दिला जातो. आता बाप्पाला प्रसादामध्ये सर्वात जास्त मोदक का आवडतात. तसेच पहिल्या प्रसादाच्या ताटात 21 मोदकच का ठेवतात याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

देवी देवतांच्या काळात वाईट शक्तीच्या राक्षसांनी आधी जन्म घेतला. या सर्व राक्षसांना संपवण्यासाठी देवता आवतरले. यामध्ये कंसाला मारण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला. तर रावणाचा वध करण्यासाठी रामाने जन्म घेतला होता. त्याचप्रमाणे वाईट वृत्तीच्या देवांतक आणि नारांतक या दोघांना संपवण्यासाठी बाप्पाने विनायक या नावाने जन्म घेतला, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.

देवांतक आणि नारांतकला संपवण्यासाठी युद्ध

देवांतक आणि नारांतकचा वध करण्यासाठी मोठं युद्ध पेटलं. युद्ध म्हटलं म्हणजे सैनिक हवेच. तर गणपती बाप्पा म्हणजे विनायकाने 20 सैनिक घेतले होते.

20 सैनिकच का घेतले?

विनायकांनी 20 सैनिकच का घेतले याचं कारण जाणून घेऊ. त्याकाळी हाताची 10 आणि पायाची 10 अशी 20 आकड्यांची आकडेमोड व्यायची. म्हणजे व्यवहारात 20 गणात पकडला जायचा. त्यामुळे विनायक यांनी 20 सैनिक घेतले होते.

20 सैनिकांचा एक गण आणि या सैनिकांचे नेतृत्व करणारा गणपती बाप्पा अशी याची कथा आहे. त्यामुळे एकूण झाले 21. प्रत्येकाला एक एक प्रसाद मिळावा यासाठी बाप्पासमोर नेहमी 21 मोदकांचा नैवेद्य ठेवला जातो. यामध्ये 21 मोदक, 21 लाडू, 21 पेढे, असे सर्व पदार्थ 21 ठेवण्याची प्रथा सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT