Hartalika Mehandi Designs Saam TV
लाईफस्टाईल

Hartalika Mehandi Designs : हरितालिकेच्या दिवशी काढा 'या' सुंदर मेहंदी डिझाइन; कुणाचीच नजर पायांवरून हटणार नाही

Ruchika Jadhav

आज सपूर्ण देशभरात हरितालिका साजरी केली जात आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक तरुणी साजश्रृंगार करत उपवास करते. तरुण मुली होणाऱ्या पतीसाठी आणि विवाहित महिला आपल्या पतीसाठी हा उपवास करतात.

हरितालिका साजरी करताना प्रत्येक स्त्री या दिवशी सुंदर साडी किंवा नवीन ड्रेस परिधान करते. तसेच आकर्षक दागिने परिधान करते. हातांवर पायांवर सुद्धा सुंदर मेहंदी रेखाटली जाते. आता तुम्ही सुद्धा हरितालिकेसाठी तयार होत असाल तर आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या काही खास डिझाइन शोधल्या आहेत.

ठिपक्यांची आलता डिझाइन

महिला सर्वाधिक ठिपक्यांची आलता डिझाइन पायांवर कोरतात. त्यासाठी सर्वात आधी लाल मेहंदी तयार करून घ्यावी लागेल.त्यानंर पायांवर संपूर्ण कडांना मेहंदी लावून घ्या. तसेच पायावर मध्यभागी एक मोठा ठिपका काढा. त्यावर आजुबाजून बारीक बारीक अन्य ठिपके काढून घ्या.

बॉर्डर डिझाइन

बॉर्डर डिझाइन प्रत्येक महिलेला सुंदर दिसते. अगदी तरुणींपासून ते वृद्ध महिलांना सुद्धा ही डिझाइन फार छान दिसते. यामध्ये पायांना तळव्यापासून थोडे वरती संपूर्ण लाल मेहंदी लावायची असते. तसेच बॉर्डरला गोल आणि बारीक डिझाइन रेखाटायची असते.

कमळाच्या फुलांची डिझाइन

तुमचे नुकतेच लग्न झाले असेल आणि लग्नानंतरची ही पहिली हरितालिका असेल तर कमळांची डिझाइन आणखी सुंदर दिसेल. तयासाठी पायांच्या बोटांना लाल मेहंदी लावून घ्या. तसेच मध्यभागी एक गोल काढून घ्या. या वर्तुळात तुम्ही सफेद रंगाचं कमळाचं फुल काढू शकता. तर पायांच्या बोटांवर सुद्धा कमळाची फुलं रेखाटू शकता.

लाल सफेद डिझाइन

पाय आणखी सुंदर दिसावेत यासाठी लाल सफेद डिझाइन सुद्धा तुम्ही बनवू शकता. पायांवर आजुबाजून लाल मेहंदी लावून घ्या. तसेच लाल मेहंदीवर तुम्ही सफेद रंगाची छान नक्षी काढू शकता. अशा डिझाइनमध्ये पाय आणखी सुंदर दिसतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT