Yamha Bike Offers Discount  Saam Tv
लाईफस्टाईल

Yamha Bike Offers Discount : गणेशोत्सवात यामाहाची बंपर ऑफर! या बाइकवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yamaha Ganesh Festival Offer:

गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही देखील नवीन बाइक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यामाहाची ऑफर पाहाच. यामाहा मोटर इंडियाने बाइक आणि स्कूटरवर ऑफर जाहीर केल्या आहेत.

जपानी दुचाकी कंपनीने 150 cc FZ बाइक आणि 125 Fi हायब्रीड स्कूटवर सूट देत आहे. ही ऑफर गणेशोत्सवापासून ते ३० सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यामाहाच्या विशेष ऑफरमध्ये कॅशबॅक आणि कमी डाउन पेमेंट आणि वाहन कर्जावरील कमी व्याजदर यांचा समावेश आहे.

मुंबईसाठी यामाहा (Yamaha) ऑफर (Offer) केवळ 150 cc FZ मॉडेल श्रेणी आणि RayZR 125 Fi Hybrid साठी वैध आहेत. या महिन्याच्या अखेरीपर्यंत, तुम्ही यामाहाच्या सवलतीच्या ऑफर आणि वित्त योजनांचा लाभ घेऊ शकता . उर्वरित महाराष्ट्रासाठी, Yamaha 150 cc FZ रेंज आणि Fascino 125 Fi-Hybrid स्कूटरवर सवलत असेल.

1. कोणत्या बाइक आणि स्कूटरवर ऑफर्स मिळतेय?

ऑफर्स आणि फायनान्‍स (Finance) स्किम्‍स १५० सीसी एफझेड मॉडेल व १२५ फाय हायब्रिड स्कूटरवर ऑफर मिळत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला 3,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय, फायनान्स स्कीम अंतर्गत डाऊन पेमेंट फक्त 7,999 रुपयांपासून सुरू होईल. या बाइकच्या कर्जावर ७.९९ टक्के व्याज आकारले जाईल.

2. यामाहा एफझेड मॉडेल

यामाहाच्या सध्याच्या मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी चार एफझेड मोटारसायकली विकते. यामध्ये FZ-X, FZS-Fi आवृत्ती 3.0, FZS-Fi आवृत्ती 4.0 आणि FZ-Fi आवृत्ती 3.0 बाइक्सचा समावेश आहे. दुसरीकडे, 125 cc Fi Hybrid स्कूटर रेंजमध्ये Fascino 125 Hybrid, Ray ZR 125 Fi Hybrid आणि Ray ZR Street Rally 125 Fi Hybrid मॉडेल समाविष्ट आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT