Chocolate Modak Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Festival 2023 :लाडक्या बाप्पासाठी बनवा खास चॉकलेटचे मोदक, झटपट बनतील; पाहा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chocolate Modak Recipe

गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पासाठी घराघरात बाप्पाच्या आवडीचे मोदक केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पाला नैवद्य म्हणून दाखवले जातात. परंतु हे मोदक खाण्यासाठी लहान मुले खूप टाळाटाळ करतात. त्यांच्यासाठी तुम्ही चॉकलेटचे मोदक करु शकतात.

आपल्याकडे अनेक प्रकारचे मोदक तयार केले जातात. त्यात उकडीचे, तळणीचे, गव्हाचे असे विविध प्रकारचे मोदक तयार केले जातात. त्यात सध्या चॉक्लेटचा मोदक तयार करण्याचा ट्रेंड आहे. आज आम्ही तुम्हाला चॉकलेट मोदकाची रेसीपी सांगणार आहोत.

साहित्य

डार्क चॉकलेट- २५० ग्रॅम

नारळाचा किस- १०० ग्रॅम

बदाम - २ चमचे (कापलेले)

काजू- २ चमचे (कापलेले)

कडेंस्ड मिल्क - ५० ग्रॅम

तूप- १ चमचा

कृती

चॉकलेटचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यात डार्क चॉकलेट विरघळून घ्या. चॉकलेट विरघळवण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चॉकलेटची वाटी ठेवा.

यानंतर एका पॅनमध्ये तूप, काजू, बदाम, पिस्ता , नारळाचा किस एकत्रितपणे मिक्स करा. त्यानंतर त्यात कडेंस्ड मिल्क टाकून मिश्रण घट्ट करुन घ्या.

तयार झालेल्या मिश्रणात चॉकलेट टाका आणि काही वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर या मिश्रणाला मोदकाच्या साच्यात टाकून आकार द्या.

मोदकाचा आकार दिल्यानंतर तुम्ही त्यावर काजू, बदाम टाकून सजवू शकता. आता तुमचे मोदक तयार आहेत. या मोदकांचा तुम्ही बाप्पाला नैवद्य दाखवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT