Rules Change in October : सणासुदीत खिशाला बसणार कात्री; 1 ऑक्टोबरपासून पैशांशीसंबंधित नियमांमध्ये होणार बदल

Rules Changes From 1st October :२०२३ वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने बाकी राहातील अशातच १ ऑक्टोबरपासून देशात अनेक मोठे बदल होणार आहे.
Rule Change in December
Rule Change in DecemberSaam Tv
Published On

Financial Rules :

सप्टेंबर महिना संपण्यासाठी अवघा आठवडा बाकी आहे. त्यानंतर सुरु होईल ऑक्टोबर महिना. २०२३ वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने बाकी राहातील अशातच १ ऑक्टोबरपासून देशात अनेक मोठे बदल होणार आहे. ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल.

1 ऑक्टोबर 2023 पर्यंत, SEBI ने म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांमध्ये नामांकन अनिवार्य केले आहे. याशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदतही 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १ ऑक्टोबरपासून बदलणार असलेल्या काही नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.

1. डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नामांकन अनिवार्य

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI ने डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नामांकन अनिवार्य केले आहे. याची मुदत ३० सप्टेंबरला संपणार आहे. यानंतर अनेक खातेदारांचे खाते बंद होऊ शकते. तसेच तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग करु शकणार नाही. याआधी देखील सेबीने डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख दिली होती. परंतु, पुन्हा ती सहा महिन्यासाठी वाढवण्यात आली. त्यासाठी लवकरच हे काम करा

2. म्युच्युअल फंड

डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांव्यतिरिक्त, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नामांकन अनिवार्य करण्यात आले आहे. याची देखील शेवटची तारीख 30 सप्टेंबर देण्यात आली आहे. यासाठी लवकरच तुम्ही खात्याचे नामांकन करा अन्यथा, कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही.

Rule Change in December
Making Cake in Cooker : बिना ओव्हनचा घरच्या घरी केक बनवताय? या सोप्या टिप्स फॉलो करा, बनेल एकदम सॉफ्ट

3. TCS नियमांमध्ये होणार बदल

जर पुढच्या महिन्यात परदेशाची वारी करण्याचा विचार करत असाल तर ७ लाख रुपयांपेक्षा कमी टूर (Tour) पॅकेज घेत असाल तर तुम्हाला ५ टक्के टीसीएस भरावा लागेल. तसेच ७ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे (Price) टूर पॅकेज घेतल्यास २० टक्के टीसीएस भरावा लागेल.

4. 2000 रुपयांच्या नोटा बदल देण्याची अंतिम मुदत

जर तुम्ही अद्यापह २००० रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील तर ३० सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा करा. रिझर्व्ह बँकेने (Bank) सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलण्याची मुदत दिली आहे.

5. जन्म प्रमाणपत्र अनिवार्य आहे

सरकार पुढील महिन्यापासून आर्थिक आणि सरकारी कामाच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. १ ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालयात प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, मतदार यादीत नाव जोडणे, आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीचा अर्ज आदी सर्व कामांसाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल.

Rule Change in December
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

6. बचत खात्यासाठी आधार कार्ड आवश्यक

छोट्या बचत योजनांमध्ये आता आधारकार्ड गरजेचे झाले आहे. PPF, SSY, पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादींमध्ये आधारकार्ड आवश्यक आहे. असे न केल्यास तुमचं खात बंद होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com