Veg Fish Fry Recipe: आता शाकाहारी सुद्धा मासे खाऊ शकतात; पाहा व्हेज फिश फ्राय रेसीपी

Veg Fish: शाकाहारी आहात पण मच्छी खायचीये? मग ही घ्या व्हेज फिश फ्राय रेसिपी
Veg Fish Fry Recipe
Veg Fish Fry RecipeSaam TV
Published On

Veg Fish Fry Recipe:

मासे खायला अनेकांना आवडते. मात्र व्हेजिटेरियन व्यक्तींना मासे खाता येत नाहीत. मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलं की मासे खाण्याचा मोह होतो. तसेच काहींना श्रावण महिना देखील थांबता येत नाही खूप मासे खावे वाटतात अशा व्यक्तींसाठी वेज फिश फ्राय रेसिपीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi Recipe News)

Veg Fish Fry Recipe
Peda Modak Recipe: मिठाईतला मोदक पेढा कसा बनवायचा?

श्रावणात देवासाठी तसेच माशांच्या प्रजनन काळासाठी मासे खाणे बंद केले जाते. मात्र मासे प्रेमींना मासे खाण्याची फार ओढ असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी वेज फिश फ्राय खावेत. आता वेज फिश फ्राय कसे बनवायचे? त्याची रेसिपी जाणून घेऊ.

वेज फिश फ्राय बनवणे फार सोपे आहे. त्यासाठी लागणारी सामग्री पुढीलप्रमाणे

  • एक कच्ची केळी

  • दोन चमचे तिखट

  • चवीनुसार मीठ

  • थोडासा मालवणी मसाला

  • तळण्यासाठी तेल

सर्वात आधी हिरव्या कच्च्या केळीची साल काढून घ्यावी. साल काढल्यावर ही केळी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. त्यानंतर फिश फ्रायसाठी वापरला जाणारा मसाला एकत्र करून घ्या. हा मसाला एकत्र केल्यावर केळीला एका बाजूने मधोमध थोडा तुकडा तोडून घ्या.

पुढे हे काप तेलात चांगले फ्राय करा. तेलात काप शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता. नंतर वरतून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून तुम्ही सजावट करू शकता. तयार झाली तुमची व्हेज फिश फ्राय डिश. आता हे फिश तुम्ही डाळ भात, तसेच टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता.

सोशल मीडियावर या रेसिपीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. काहींनी यावर हसण्याचे ईमोजी पाठवले. तर काहींना ही रेसिपी फार आवडली आहे.

Veg Fish Fry Recipe
Gauri Pujan Recipe 2023 : लाडक्या गौराईसाठी बनवा टम्म फुगेल अशी खवा पोळी, तोंडात टाकताच विरघळेल; पाहा स्पेशल रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com