Ganesh Chaturthi 2025 saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2025: 3 वर्षानंतर बुधवारच्या दिवशी गणेश चतुर्थीचा संयोग; पाहा आजचे शुभ योग कोणते?

Ganesh Chaturthi on Wednesday: आज, २७ ऑगस्ट रोजी सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या वर्षी गणेश चतुर्थीचा सण ३ वर्षांनंतर बुधवारच्या दिवशी आला आहे, जो एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ संयोग मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

  • २०२५ मध्ये गणेश चतुर्थी बुधवारी आहे.

  • बुधवारी गणेश पूजा अत्यंत मंगलकारक आहे.

  • चित्रा नक्षत्र आणि शुभ योगाचा संगम आहे.

२०२५ मध्ये गणेश चतुर्थीचा खास योग जुळून आला आहे. यावर्षी २७ ऑगस्ट रोजी बाप्पांची स्थापना बुधवारी केली जाणार आहे. बुधवार हा दिवस गणपतीच्या पूजेसाठी अतिशय मंगल मानला जातो. या दिवशी शुभ योग आणि नक्षत्राचाही संगम होताना दिसतोय. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूजेचं फळ अधिक वाढणार आहे. मात्र, या दिवशी चंद्रदर्शन वर्ज्य असणार आहे.

बुधवारी गणेश चतुर्थीचा दुर्मिळ संयोग

ज्योतिषाचार्य अनीश व्यास यांच्या मते, २०२२ नंतर आता २०२५ मध्ये तीन वर्षांनी हा संयोग पुन्हा आला आहे. बुधवारच्या दिवशी शुभ व शुक्ल योगासह गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी ‘स्वयं सिद्ध अबूझ मुहूर्त’ ही लाभदायी वेळ मिळणार असून, या वेळी पूजा करण्याबरोबरच घर, वाहन, दागदागिने किंवा जमिनीची खरेदी केली तर ती दीर्घकाळ शुभ फलदायी ठरणार आहे.

२७ ऑगस्टचे शुभ योग

२७ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच आज भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना होणार आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र, शुभ योग आणि विष्टि करण एकत्र येणार आहेत. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक शुभ चौघडिया लाभदायी असतील.

  • लाभ : सकाळी ६:११ ते ७:४१

  • अमृत : सकाळी ७:४१ ते ९:११

  • शुभ : सकाळी १०:४१ ते दुपारी १२:११

  • चंचल : दुपारी ३:११ ते ४:४१

  • पुनः लाभ : संध्याकाळी ४:४१ ते ६:११

गणेशोत्सवातील दहा दिवसांचे महत्त्व

गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस गणेशोत्सव साजरा होतो. या दहा दिवसांत गणपतीच्या दहा वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे.

  • पहिला दिवस – गणाधिप

  • दुसरा दिवस – उमा पुत्र

  • तिसरा दिवस – अघनाशन

  • चौथा दिवस – विनायक

  • पाचवा दिवस – ईश पुत्र

  • सहावा दिवस – सर्वसिद्धी प्रदायक

  • सातवा दिवस – एकदंत

  • आठवा दिवस – इभवक्र

  • नववा दिवस – मूषक वाहन

  • दहावा दिवस – कुमार गुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : वर्ल्डकप जिंकूच शकत नाही! टीम इंडियाच्या निवडीवर महान खेळाडू भडकला

Google Translate New Feature: गुगल ट्रान्सलेटने आणलं धमाकेदार फीचर, अनेक भाषा शिकता येणार

Nagpur News: शेतात काम करताना वीज कोसळली; मायलेकासह तिघांचा मृत्यू

Manoj Jarange: जुन्नरमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष; दोन लाख आंदोलकांसाठी ‘मायेचा घास’ भाकरी-चटणीची मेजवानी|VIDEO

Bhogwe Beach : गणपतीला कोकणात गेलाय, भोगवे समुद्र किनाऱ्यावर मारा फेरफटका

SCROLL FOR NEXT