Decoration Wholesale Market Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2024: फक्त १०० रुपयांपासून सुरुवात, गौरी-गणपतीच्या डेकोरेशनसाठी मुंबईतील 5 होलसेल ठिकाणं, तुम्ही गेलात का? '

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑगस्ट महिना संपताच प्रत्येकाला वेध लागलेले असतात ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे. सध्या गणेश उत्सवाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिलेले आहेत शिवाय गणरायाच्या आगमनाबरोबरच गौराईचे ही आगमन होणार आहे. आपल्यापैंकी प्रत्येकजण गणपती बाप्पा येण्याची वाट पाहत आहोत त्याच बरोबर महिला वर्ग गौराईच्या आगमनाचीही तयारी करत आहेत.

त्यांच्या तयारीत आपण अधिक मग्न होत असतो मात्र, गणपत्ती बाप्पाच्या आणि गौराईच्या आगमनासाठी तयारी कशी करावी शिवाय डेकोरेशन कसे करायचे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. मात्र सध्या बाजारात आपल्याला अनेक डेकोरेशन तयार मिळतात किंवा ते डेकोरेशन पाहून नवीन कल्पना सुचतात.

महाराष्ट्र (Maharashtra)अनेक सण-उत्सव आणि विविध कलेने संपन्न असा आहे. चैत्र्य महिना येताच अनेक सणांची सुरुवात होते. हे प्रत्येक सण महाराष्ट्रातला प्रत्येकजण हर्ष-उत्साहाने साजरा करतो. कोणताही सण असो त्या सणाची तयारी आपल्याकडे उत्साहाने केली जाते. मग सध्या गणरायचे आगमन होण्यासाठी काही दिवस उरले असताना प्रत्येक व्यक्तीची धावपळ सुरु आहे ती फक्त आणि फक्त डेकोरेशनसाठी.

सणांची सुरुवात होताच प्रत्येक शहरातील बाजारपेठा सज्ज होतात त्या अनेक प्रकारच्या डेकोरेशनच्या वस्तूंनी तसेच अनेक प्रकारच्या मिठाईंनी. आपल्यापैंकी बरेचजण असे आहेत,जे विविध थीम ठरवतात आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी डेकोरेशन करतात.मग त्यासाठी बाजारपेठामधून अनेक वस्तूंची खरेदी (Purchase)करतात.

मग त्यात अनेक प्रकारच्या फुलांच्या माळा,हार तर कधी आर्टिफिशियल वस्तू असतील.मग अनेकांना या सर्व डेकोरेशनच्या वस्तूंसाठी अनेक शहर अनेक ठिकाणे पालते घालावे लागते.तेव्हा कुठे जाऊन मनासारखी वस्तू मिळते ती डेकोरेशनसाठी. जर तुम्ही मुंबई शहरातील रहिवासी असाल आणि गणरायाच्या आरासासाठी तसेच आगमनाच्या थीमसाठी डेकोरेशनच्या वस्तू शोधत असाल तर, आज आम्ही तुम्हाला खालीले विशेष लेखमध्ये मुंबईतील काही निवडक बाजारपेठ सांगणार आहोत,जेथे तुम्हाला मुबलक किंमतीत आणि आकर्षक पद्धतीच्या डेकोरेशनच्या वस्तू मिळतील.

मुंबई शहर कायमच तेथे असलेल्या वास्तू तसेच पदार्थ आणि प्रेमळ माणंसाठी प्रसिद्ध आहे,अशा मुंबई शहराचे नावे घेताच तेथे असलेल्या उपनगरांना विसरुन केसे चालेले.मुंबई आणि मुंबईतील अनेक उपनगरात सध्या गणरायाच्या आगमन सोहळा थाटामाटा पार पडत आहेत.या उपनगरात अनेक मार्केट आहेत तेथे तुम्ही गणपती डेकोरेशन सह गौराईच्या डेकोरेशनच्या वस्तू घेण्यासाठी नक्की जावा.

कीर्तीकर मार्केट

Kirtikar Market

जर तुम्हीही मुंबईमध्ये राहत असाल तर प्रसिद्ध 'दादर' शहरातील 'कीर्तीकर' या मार्केटला नक्की भेट द्या.या मार्केटमध्ये तुम्हाला असंख्य अशा डेकोरेशनच्या वस्तू पाहायला मिळतील. गणपत्ती बाप्पाच्या डेकोरशनसाठी आणि गौराईच्या(Gourai's) डेकोरेशनसाठी लागणारे कृत्रिम फुल असतील तर अनेक प्रकारच्या माळा तर दागिने तुम्हाला अगदी कमी किंमतीत येथे खरेदी करता येतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मार्केट 'सोमवार' या दिवशी बंद असते.

क्रॉफर्ड मार्केट

Crawford Market

मुंबईकर असो वा उपनगरातील कोणताही व्यक्ती ज्याला 'क्रॉफर्ड मार्केटबद्दल' माहिती नसेल. या मार्केटमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या वस्तूच नाही तर महिलांच्या दागिनेपासून ते प्रत्येक वस्तू अगदी होलसेल किंमतीत मिळतात.मग या मार्केटला जायचा तुमचा विचार असल्यास एक गोष्ट लक्षात ठेवा की,सकाळी लवकर जावे,कारण क्रॉफर्ड मार्केट अतिशय मोठा परिसर आहे शिवाय हे मार्केट 'रविवारी' बंद असते. क्रॉफर्ड मार्केटला जाण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरुन टॅक्सी उपलब्ध होईल.

रानडे रोड मार्केट

Ranade Road Market

दादर शहराच्या पश्चिमेस 'रानडे रोड मार्केट' आहे. दादर स्टेशनला उतराचा तुम्ही 'पश्चिमेस' गेलात तर एक संपूर्ण गल्ली रानडे रोड मार्केटची(market) आहे. ताज्या फुलांपासून ते गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी हेही मार्केट अतिशय प्रसिद्ध आहे.या ठिकाणी तुम्हाला लहान लहान असलेल्या स्टॉलमध्ये अतिशय कमी किंमतीत डेकोरेशनच्या भारीतल्या भारी वस्तू मिळतील. शिवाय डेकोरेशनच्या पारंपारिक वस्तूसाठी रानडे रोड मार्केट प्रसिद्ध आहे.महत्त्वाचे म्हणजे रानडे रोड मार्केट 'सोमवारी' बंद असून सकाळी १० वाजता तेथील डेकोरेशनचे स्टॉल चालू होतात.

सांताक्रूझ मार्केट

Santa Cruz Market

जर काही कामानिमित्ताने सांताक्रूझला जात असाल,तर गणपती(ganeshotsav) बाप्पाच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेले 'सांताक्रूझ मार्केट' पाहायला विसरु नका.अनेक विविध प्रकारचे दिवे शिवाय डेकोरेशनसाठी लागणारे फॅब्रिक्स येथे तुम्हाला कमी किंमतीत मिळतील. सांताक्रूझ मार्केटला जाण्यासाठी तुम्हाला फक्त सांताक्रूझ स्टेशनवर उतरावे लागेल कारण हे मार्केट सांताक्रूझ स्टेशनच्या 'पश्चिम' दिशेस गेल्यास बाहेरच आहे. महत्त्वाचे लक्षात ठेवा की हे मार्केट 'गुरुवारी' बंद असते.

विलेपार्ले मार्केट

Vileparle Market

आता आपण मुंबईतील गणपती डेकोरेशनसाठी असलेले शेवटचे मार्केट पाहणार आहोत.जे 'विलेपार्ले' स्टेशनच्या अगदी बाहेरच आहे. गणपती डेकोरेशन असो वा अन्य डेकोरेशनच्या वस्तू तुम्हाला तेथे पाहायला मिळतात.मग रेडी थीम डेकोरेश असो वा विविध वस्तू तुम्हाला येथे खरेदी करायला मिळतात. शिवाय गौराईच्या आगमानाच्या अनेक वस्तूही तुम्हाला मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT