Ganesh Chaturthi 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2024: गणरायासाठी खास नैवेद्य; मोदकांव्यतिरिक्त गणपती बाप्पाला आवडतात 'हे' गोड पदार्थ

Ganesh Chaturthi Naivedya : बाप्पाला मोदक फार आवडतात त्यामुळे नैवेद्यात ते ठेवावेच लागतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पाला मोदकांव्यतिरिक्त आणखी काही गोड पदार्थ फार आवडतात.

Ruchika Jadhav

गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 7 सप्टेंबरला बाप्पा सर्वत्र विराजमान होत आहे. घरात सर्व महिला बाप्पाच्या आवडीच्या पदार्थांची रेसिपी जाणून घेत आहेत. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींनी देखील मोदक बनवण्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे. काही महिलांना मोदक हवे तसे बनवता येत नाहीत. पण बाप्पाला मोदक फार आवडतात त्यामुळे नैवेद्यात ते ठेवावेच लागतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पाला मोदकांव्यतिरिक्त आणखी काही गोड पदार्थ फार आवडतात. तुम्ही हे पदार्थ सुद्धा नैवेद्याला ठेवू शकता. त्यामुळे आज याच पदार्थांची यादी जाणून घेणार आहोत.

लाडू

गणपती बाप्पाला आवडणारा दुसरा गोड पदार्थ म्हणजे लाडू. पौराणिक कथांपासून गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ लाडू आहे. त्यामुळे तुम्ही घरच्याघरी लाडू बनवू शकता. बाप्पासह मुषकराजाला देखील लाडू फार आवडतात.

श्रीखंड

गणपती बाप्पाला तुम्ही नैवेद्यात श्रीखंड सुद्धा देऊ शकता. त्यासाठी दही, साखर आणि विविध पद्धतीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही एकत्र मिक्स करून श्रीखंड बनवू शकता. मोदकांव्यतिरिक्त तुम्ही हा प्रसाद गणपती बाप्पाला देऊ शकता.

पुरण पोळी

हरभरा डाळ आणि त्यामध्ये गूळ मिक्स करा. तसेच यात चवीसाठी सुंठ आणि जायफळ मिक्स करा. गव्हाच्या किंवा मग मैद्याच्या पिठात तुम्ही बाप्पासाठी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवू शकता.

नारळी भात

नारळी भात गणपती बाप्पसह घरात लहान मुलांना आणि मोठ्यांना देखील फार आवडतो. हा भात बनवताना तुम्हाला आधी ओला नारळ किसून द्यायचा आहे. त्यानंतर यातील दुधामध्ये भात शिजवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही नारळी भात बनवू शकता.

खीर

गणपती बाप्पाच्या नैवेद्यात आणखी एक गोड पदार्थ म्हणजे खीर. खीर तुम्ही तांदूळ आणि गुळाची सुद्धा बनवू शकता. ही खीर नैवेद्यात अर्पण करता येते. तुम्हाला हवे तसे तुम्ही यामध्ये शेवया सुद्धा मिक्स करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

Amaal Mallik Break: 'तूर्तास आपली रजा घेतो...'; प्रसिद्ध संगीतकाराचा चित्रपटसृष्टीला रामराम, कारण सांगत म्हणाला...

SCROLL FOR NEXT