Ganapati Festival 2023: श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे पाकिस्तान, अमेरिका अन् युएईतही भक्त; ५६ लाख भाविकांनी घेतले ऑनलाईन दर्शन

Shrimant Dagadusheth Halwai Ganapati Pune: जगभरातील तब्बल ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे.
Shrimant Dagadusheth Halwai Ganapati Pune
Shrimant Dagadusheth Halwai Ganapati PuneSaamtv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी

Dagadusheth Ganapati Online Darshan 2023:

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची किर्ती जगभरात आहे. सध्या गणेशोत्सव सरू असल्याने बाप्पाच्या आगमनाने आणि भाविक भक्तांच्या गर्दीने पुणे शहर खुलून गेले आहे. देशभरातून असंख्य भाविक दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येत आहेत. प्रत्यक्ष दर्शन घेता न येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टने ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली. ज्यामधून जगभरातील तब्बल ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे.

Shrimant Dagadusheth Halwai Ganapati Pune
Bribe Trap: २० हजारांची लाच घेताना अभियंत्याला अटक; लघुपाटबंधारेतील बिलासाठी घेतली रक्कम

गणपती विसर्जनाला (Ananth Chaturthi) अवघे दोन दिवस उरल्याने बाप्पाच्या दर्शनासाठी पुणे शहरात (Pune) भाविक गर्दी करत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विविध भागांतून लोक पुण्य नगरीत येत असतात. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन प्रत्यक्ष घेता आले नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविक घेत आहेत.

ट्रस्टतर्फे विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यंदा गणेशोत्सव काळात जगभरातील तब्बल ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेतले. यामध्ये सुमारे ३४ लाख ६९ हजार भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर २१ लाख ७७ हजार यांसह १८ हजारहून अधिक यूटयूब व अ‍ॅप वरुन देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे.

नेपाळ,अमेरिका, थायलंड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधून भाविकांनी वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन घेतले आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी शहरातही भाविक गर्दी करत असून यंदा दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून उभारण्यात आलेला राम मंदिराचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. (Latest Marathi News)

Shrimant Dagadusheth Halwai Ganapati Pune
KDMC News: अधिकाऱ्यांच्या नावाने दगडं टाकत निषेध; कल्याण डोंबिवलीत मनसेचे अनोखे खड्डे भरो आंदोलन  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com