Fasting Modak : मस्तच! घरच्याघरी बनवा उपवासाचे मोदक; वाचा ५ मिनिटांत झटपट तयार होणारी रेसिपी

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीनिमित्त अनेक व्यक्ती उपवास करतात. देवाची मनोभावे सेवा करताना यामध्ये उपवास देखील केला जातो.
Ganesh Chaturthi 2024
Fasting ModakSaam TV
Published On

गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या आगमनामुळे प्रत्येक जण तयारीला लागले आहेत. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक व्यक्ती उपवास करतात. देवाची मनोभावे सेवा करताना यामध्ये उपवास देखील केला जातो.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024: झाली का गणपतीची तयारी? आताच लिहून ठेवा बाप्पाची स्थापना आणि पुजेची सामग्री!

गणपती घरी येणार म्हणून या दिवशी घरी अनेक प्रकारचे नैवेद्य आणि गोड पदार्थ बनवले जातात. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बाप्पासाठी उकडीच्या आणि तळलेल्या मोदकांचा नैवेद्य बनवत असाल. मोदक घरात प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचे असतात. मात्र उपवास असल्याने अनेक व्यक्ती मोदक खात नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी उपवासाचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी आणली आहे.

सारण बनवण्यासाठी साहित्य

काळी खजूर

काजू

अक्रोड

मिल्क पावडर

पिस्ता

सारण बनवण्याची कृती

सारण बनवताना सर्वात आधी खजूरमधील सर्व बिया काढून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडी मिल्क पावडर, काजू, अक्रोड आणि पिस्ता एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. तयार झालं तुमचं गोड सारण.

कणीकसाठी साहित्य

वरई

साबुदाणे

दूध

तूप

कृती

कणीक तयार करण्यासाठी सर्वात आधी वरई आणि साबुदाणे एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. पीठ बनवून घेतल्यावर एका भांड्यात २ कप पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात दूध आणि तूप मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये पीठ मिक्स करा. पीठ मिक्स करत सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. तयार पीठ गॅस बंद करून थोडे कोमट झाले की त्याची छान कणीक मळून घ्या.

आता आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो तसे एक एक करून पिठाच्या पाऱ्या बनवून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं मिश्रण भरून घ्या. असे मोदक तयार करताना एका बाजूला गॅसवर मोदक वाफवण्याची तयारी सुरू करा. पाणी उकळलं की त्यात एक एक करून सर्व मोदक ठेवून घ्या आणि उकड काढून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचे मोदक घरच्याघरी बनवू शकता.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024: फक्त १०० रुपयांपासून सुरुवात, गौरी-गणपतीच्या डेकोरेशनसाठी मुंबईतील 5 होलसेल ठिकाणं, तुम्ही गेलात का? '

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com