Ganesh Chaturthi 2023 Bank Holiday Saam Tv
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2023 Bank Holiday: गणेशोत्सवानिमित्त या पाच दिवशी बँका राहणार बंद, महत्त्वाची कामे आजच करुन घ्या

Bank Holiday : गणेशोत्सवानिमित्त गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह देशातील सर्वच भागात बँका राहणार आहेत.

Shraddha Thik

Bank Holiday For Ganesh Festisav 2023:

यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने 19 आणि 20 सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी बँकांना सुटी असणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह देशातील सर्वच भागात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बँका केव्हा आणि कुठे बंद होतील ते हे जाणून घ्या.

RBI कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थीनिमित्त 19, 20, 23, 24, 28 सप्टेंबर रोजी विविध शहरांमध्ये सुट्टी असेल.

या ठिकाणी बँकांना सुट्टी असेल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या यादीनुसार, अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई (Mumbai), नागपूर, पणजी येथे गणेश चतुर्थीमुळे 19 सप्टेंबर रोजी बँकांना सुट्टी असेल. भुवनेश्वर आणि पणजीमध्ये 20 सप्टेंबरला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नुआखाईमुळे बँका बंद राहतील.

अशाप्रकारे भुवनेश्वर आणि पणजीमध्ये 19 आणि 20 सप्टेंबर रोजी बँका (Bank) बंद राहतील. 23 सप्टेंबर चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील. 24 सप्टेंबर रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 28 सप्टेंबर गुरुवारी अनंत चतुर्थी असल्याने बँका बंद राहतील

गणेशोत्सवाचे महत्त्व काय?

भगवान गणेशाला (Ganesh) दुःखहर्ता, शुभ आणि विघ्नहर्ता या नावांनी ओळखले जाते. असे मानले जाते की, गणेश चतुर्थीच्या वेळी ज्या घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि विधीनुसार पूजा केली जाते, त्या घरातील सर्व संकटे, समस्या आणि अडथळे गणपती आपल्यासोबत घेऊन जातात.

अशा घरात सर्व काही शुभ असते. लोक वर्षभर या सणाची वाट बघतात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

SCROLL FOR NEXT