Manasvi Choudhary
गणपती बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहे.
गणपतीची पूजा करताना दुर्वा वाहिला जातो.
गणपती बाप्पाच्या डोक्यावर दुर्वा का वाहिला जातो यामागचे कारण जाणून घेऊया
पौराणिक कथेनुसार, अनलासुर नावाच्या राक्षसाच्या भयंकर वृत्तीमुळे सर्व हैराण झाले होते.
अनलासुर राक्षस पृथ्वीवरील मानवांना जिवंत गिळत असे,या त्रासाने व्यथित झालेल्या सर्व देवतांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली
यावेळी, भगवान शंकरानी अनलासुर राक्षसाचा नाश केवळ गणेश करू शकतो असे सांगितले
गणेशाने संपूर्ण पृथ्वीचे रक्षण व्हावे म्हणून अनलासुर या राक्षसाला सोडेंत धरून गिळकृत केले
त्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ झाली यावेळी गणपतीचा त्रास बघून ऋषीमुनींनी उपचार सुरू केले
यावेळी गणरायाला २१ हिरव्या दुर्वाच्या जुड्या खायला दिल्या दुर्वा दिल्यानंतर गणपतीच्या पोटातील जळजळ कमी झाली.
तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपतीच्या पूजनात दुर्वा वाहिल्या जातात.