Ganesh Chaturthi 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा मोरया..., श्रीगणेशाच्या जयघोषात 'मोरया' का म्हटले जाते? याचा नेमका अर्थ काय?

Reason Of Ganpati Bappa Morya : तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? गणपती बाप्पा मोरया.... यातील मोरया हा शब्द आला कुठून, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

Ganpati Bappa Morya :

गणपती बाप्पा मोरया... या जयघोषात संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमला आहे. लाडक्या गणरायाचे आगमन लवकरच घरोघरी होईल. १९ सप्टेंबरला श्रीगणेश विराजमान होणार आहे. तर २८ सप्टेंबरला १० दिवसांच्या गणेशाचे विसर्जन होईल.

लाडक्या गणरायाला अनेक नावांनी संबोधले जाते. या दहा दिवसांत गणपतीची विधीवत पूजा अर्चना केली जाते. तसेच लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडीचा मोदक आणि लाडूचा प्रसादही अर्पण केला जातो. परंतु, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? गणपती बाप्पा मोरया.... यातील मोरया हा शब्द आला कुठून, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊया

1. गणपती या शब्दाचा अर्थ काय?

गणपती (Ganpati) या शब्दातील गण या शब्दाचा अर्थ समूह आणि पती म्हणजे प्रभु असा अर्थ होतो. म्हणजेच गणपतीला समूहाचा स्वामी म्हटले जाते.

2. बाप्पा या शब्दाचा अर्थ काय?

बाप्पा (Bappa) हे गणेशाच्या इतर नावांपैकी एक नाव. यातून श्रीगणेशाची भक्ती आणि भावना दर्शविले जाते.

3. मोरया हा शब्द नेमका आला कुठून?

मोरया हा शब्द मराठी असून त्याचा अर्थ जिंकणे किंवा विजय (Success) होणे असा होतो. तर गणपती बाप्पा मोरया या शब्दाचा संपूर्ण अर्थ 'आमच्या समुहाचा स्वामी भगवान गणेशा, विजयी होवो.' याच्या उच्चाराने मन शांत होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

SCROLL FOR NEXT