Ganesh Chaturthi 2022  Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2022 : गणरायाला अर्पण केल्या जाणाऱ्या 'या' फुलाचे आहेत अनेक फायदे, त्वचेसोबत तोंडाचे आरोग्यदेखील सुधारते !

सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत.

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi 2022 : सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. या दहा दिवसात आपण बाप्पाची मनोभावे पूजा व अर्चना करतो. दारी तोरण लावतो. फुलांच्या माळेने संपूर्ण घर देखील सजवतो.

बाप्पाला वाहिले जाणारे झेंडूचे फुले हे त्याच्या चरणाजवळ जितके सुंदर दिसते तितकेच ते आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. झेंडूचे फूल हे आपल्या घरात साधारणत: सणा-समारंभात येते.

झेंडूच्या फुलाला विशेष गंध जरी नसला तरी, त्याचा रंग प्रत्येकाला आकर्षित करतो. आपल्या भारतीय संस्कृतीत काही विशिष्ट सणांना त्याचे तोरण बांधले जाते पण तोरणा व्यतिरिक्त त्याच्या आरोग्याला कसा फायदा होईल हे जाणून घेऊया.

१. सनबर्नवर परिणामकारक :

Sun screen

झेंडूच्या तेलात सन प्रोटेक्शन फॅक्टर (SPF) असतात. त्या तेलात SPF14 इतकी क्षमता असते. झेंडूच्या तेलाचे काही थेंब आपल्या फेसक्रीममध्ये घालून त्याचा सनस्क्रीम म्हणून वापर करता येऊ शकतो. डिस्टिल्ड पाण्यात तेलाचे काही थेंब घालून ते पाणी चेहऱ्यावरही स्प्रे करु शकतो.

२. तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी :

Teeth Care

दातांवर जमा होणाऱ्या प्लागमध्ये बॅक्टरीया असतात. त्यामुळे दात खराब होतात. तसेच त्यामुळे हिरड्यांचे विकार उद्भवतात. या त्रासांवर झेंडू परिणामकारक आहे. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात झेंडूच्या रसाचे काही थेंब घालून गुळणा करा यामुळे दातांवरील प्लाग, हिरड्यांचे विकार नाहीसे होण्यास मदत होईल.

३. जखम भरुन निघेल :

Finger Heal

बोट चिरल्यास किंवा कोणत्याही भागी जखम झाल्यास झेंडूचे तेल किंवा त्याचा अर्क लावा. झेंडूच्या फुलाचा अर्क ही जखम भरून काढण्यास मदत करतो.

४. त्वचेच्या समस्येसाठी :

Skin Care Tips

त्वचेच्या (Skin) अनेक विकारांवर मात करण्यासाठी आपण झेंडूच्या फुलाचा अर्क किंवा तेल वापरू शकतो. यात असणारे घटक त्वचेसाठी फायदेशीर (Benefits) असतात. तसेच चेहरा मॉश्चरायिझ देखील होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT