Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2022 : अष्टविनायका तुझा महिमा कसा..!

कोमल दामुद्रे
श्री मयुरेश्वर गणपती

१. श्री मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगाव -

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती (Ganpati) हा मोरगावचा मयूरेश्वर. महाराष्ट्रातील पुण्यामधील मोरगाव. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस 'श्री मोरेश्वर' असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याचं मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

श्री चिंतामणी

२. श्री चिंतामणी मंदिर, थेऊर -

अष्टविनायकांपैकी (Ashtavinayak) श्री चिंतामणी हा दुसरा गणपती पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर या गावात आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला 'चिंतामणी' म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे हे खूप मोठे गणेशभक्त होते.

श्री सिद्धिविनायक

३. श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक -

सिद्धटेकचा 'श्री सिद्धिविनायक' हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत.

महागणपती

४. श्री महागणपती मंदिर, रांजणगाव -

अष्टविनायकांपैकी 'महागणपती' हा चौथा गणपती. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते.

विघ्नेश्र्वर

५. श्री विघ्नहर मंदिर, ओझर -

अष्टविनायकांपैकी ओझरच्या 'विघ्नेश्र्वर' हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

श्री गिरिजात्मक मंदिर

६. श्री गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री -

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

वरदविनायक

७. श्री वरदविनायक मंदिर, महाड -

महाडचा 'वरदविनायक' हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. रायगड जिल्ह्यातील महाड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूरच्या दरम्यान आहे.

श्री बल्लाळेश्वर मंदिर

८. श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली -

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला 'श्री बल्लाळेश्वर' म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ते चिमाजी अप्पांनी अर्पण केले आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

SCROLL FOR NEXT