Gallstones News Saam TV
लाईफस्टाईल

Gallstones News : पित्ताशयातील खडे कसे बरे होतात? वाचा डॉक्टरांनी सांगितलेले समज आणि गैरसमज

Gallstones Misunderstandings : काही व्यक्तींना असं वाटतं की पित्ताशयातील हे खडे फक्त महिलांनाच होतात. मात्र महिलांसह पुरुषांना देखील पित्ताशयातील खड्यांचा सामना करावा लागतो. पुरुषांमध्येही या आजाराचं प्रमाण आढळलं आहे.

Ruchika Jadhav

पित्ताशयातील खडे ही एक गंभीर समस्या आहे. अनेक व्यक्ती सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे काही काळाने हा त्रास असह्य होतो. पित्ताशयातील खडे आणि मुतखडे हे दोन्ही वेगळे आहेत. मात्र अनेक व्यक्तींच्या मनात या आजाराबाबत गैरसमज आहेत. त्यामुळे सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ.अपर्णा गोविल भास्कर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

फक्त वयस्कर लोकांनाच पित्ताशयाचे खडे होतात, असा काही व्यक्तींचा समज आहे. मात्र खरंतर हा एक गैरसमज आहे. पित्ताशयातील खडे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होतात. लहान मुले आणि तरुण प्रौढांसह सर्वच वयोगटातील लोकांना हा त्रास होऊ शकतो. चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पित्ताशयाचे खडे होतात, हा देखील एक गैरसमज आहे.

उच्च चरबीयुक्त आहार असल्यास पित्ताशयातील खडे होतात. मात्र या आजाराचं हेच एकमेव कारण नाही. अनेक व्यक्तींना पित्ताशयातील खड्यांचा त्रास आनुवंशिकता, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, वजन कमी होणे आणि मधुमेह किंवा यकृत रोग यासारख्या काही कारणांमुळे देखील होतो.

पित्ताशयाचं ऑपरेशन केल्याने वजन कमी होतं?

पित्ताशयकाढून टाकल्याने म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर वजन वाढतं हा एक गैरसमज झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर आपण जास्त हलचाल करत नाही. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. पित्ताशयातील खडे औषधोपचार किंवा नैसर्गिक उपायांनी विरघळतात हा एक गैरसमज आहे.

पित्ताशय शुद्धीकरण करणे किंवा डिटॉक्स हे पित्ताशयातील खडे बरे करू शकतात असं काहींना वाटतं. मात्र हा देखील एक गैरसमज आहे. पित्ताशयाच्या खड्यांवर उपचार करताना पित्ताशय शुद्धीकरण किंवा डिटॉक्सच्या प्रभावीतेचे समर्थन करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असं डॉ अपर्णा गोविल भास्कर यांनी म्हटलंय.

काही व्यक्तींना असं वाटतं की पित्ताशयातील हे खडे फक्त महिलांनाच होतात. मात्र महिलांसह पुरुषांना देखील पित्ताशयातील खड्यांचा सामना करावा लागतो. पुरुषांमध्येही या आजाराचं प्रमाण आढळलं आहे.

पित्ताशयाचा त्रास असल्यास त्या व्यक्तीने त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खडे काढताना पित्ताशय काढले जाईल या भीतीने दुखणं अंगावर काढूनये. तसे केल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

SCROLL FOR NEXT