Gautam Buddha Thoughts: सुखी जीवनासाठी फॉलो करा गौतम बुद्धांचे अनमोल विचार; दु:ख आणि चिंता कायमची मिटेल

Buddha Quotes for Inspiration and Motivation : बुद्धांनी दिलेला हा धर्म फक्त एक धर्म नसून तो सुखी जीवनाचा विचार आहे. त्यामुळे आज बुद्धांनी सागितलेले काही खास विचार जाणून घेऊ.
Gautam Buddha Thoughts
Gautam Buddha ThoughtsSaam TV

त्यागमूर्ती, महाकारूनी तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला बौद्ध धर्म दिला. बुद्धांनी दिलेला हा धर्म फक्त एक धर्म नसून तो सुखी जीवनाचा विचार आहे. ज्या व्यक्ती हा विचार फॉलो करतात त्यांच्या जीवनात भय, भीती आणि दु:ख राहत नाही. त्यामुळे आज बुद्धांनी सांगितलेले काही खास विचार जाणून घेऊ.

Gautam Buddha Thoughts
Gautam Buddha Thoughts : तु चाल पुढं... गौतम बुद्धांच्या विचारांनी करा दिवसाची सुरुवात, नेहमी चढाल यशाची पायरी !

चिंता करून नका

बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना कारणाने दु:खी आहे. मात्र आपण त्या दु:खाची चिंता न करता त्याचे चिंतन करावे. त्याने तुमच्या अडचणी दूर होतील. चिंता केल्याने तुमचं टेन्शन आणखी वाढेल. तर त्या अडचणीचे चिंतन केल्याने सर्व गोष्टी निट समजतील आणि त्यावर योग्य तो मार्ग निघेल.

स्वतावर विजय मिळवा

प्रत्येक व्यक्ती आपलं आयुष्य जगत असताना स्पर्धा करत असतो. स्पर्धा करतच समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण किती सरस आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. यावर बुद्ध सांगतात जीवनात हजारो युद्धांमध्ये विजय मिळवण्यापेक्षा स्वतावर आणि स्वताच्या मनावर विजय मिळवा. त्यानंतर तुमच्या आयुष्यात आलेला आनंद आणि सुख तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

कर्म तसे फळ

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात जगत असताना जर वाईट कर्म करत असेल तर त्याची वाईट फळे मिळतात. मात्र जर व्यक्ती चांगले आणि निर्मळ मनाने कर्म करत अलेस तर त्याच्या वाट्याला नेहमीच आनंद आणि समाधान राहते.

प्रेमाने जग जिंका

आपल्याला एखाद्या व्यक्तीने दु:ख दिल्यास त्याला समज यावी यासाठी तुम्ही देखील त्या व्यक्तीला दु:ख देऊ नका. कारण दु:खाने, क्रोधाने आणि द्वेशाने केवळ व्यक्ती आपल्या जवळची माणसे आपल्यापासून दूर जातात. त्यामुळे भांडणे , क्रोध या गोष्टी बाजूला ठेवा आणि प्रेमाने सोरच्या व्यक्तीशी संवाद साधा.

भविष्याची चिंता करू नका

आपण आज जे कर्म करणार आहोत त्याचेच फळ आपल्याला उद्या मिळणार आहे. म्हणजे त्यानुसार आपले भविष्य असणार आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती भविष्याची चिंता करत टेन्शन घेतात, त्रस्त होतात, आजारी पडतात मात्र तसे न करता आजचा दिवस भरभरून जगता आला पाहिजे. त्याच भविष्याची चिंता न करता फक्त चांगले कर्म करता आले पाहिजे.

सुखी रहा

आपल्या जीवनात काही दु:ख असेल अशावेळी आपल्यासाठी एखाद्या व्यक्तीने स्माइल केलं किंवा काही स्पेशल करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला मोठा आनंद होतो. दु:खातून बाहेर पडण्यासाठी आधार मिळतो. आपण जितके आनंदी राहू तितकेच निरोगी राहतो. त्यामुळे कायम स्वत: आनंदी राहा आणि दुसऱ्यांना देखील आनंद द्या.

Gautam Buddha Thoughts
Gautam Buddha Thoughts : अस्थिर मनाला स्थिर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गौतम बुद्धाचे विचार...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com