Galaxy S24 Series Saam Tv
लाईफस्टाईल

Galaxy S24 Series : भारतात 'मेड इन इंडिया' गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजच्‍या विक्रीला सुरूवात

Galaxy S24 Series Specification : सॅमसंगने नुकतेच लाँच केलेल्‍या गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजच्‍या विक्रीला आजपासून सुरूवात होईल. 'मेड इन इंडिया' गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२४+ आणि गॅलॅक्‍सी एस२४ स्‍मार्टफोन्‍स लाइव्‍ह ट्रान्‍सलेट, इंटरप्रीटर, चॅट असिस्‍ट, नोट असिस्‍ट व ट्रान्स्क्रिप्‍ट असिस्‍ट वैशिष्‍ट्यांसह येतात.

कोमल दामुद्रे

Galaxy S24 Series Features :

सॅमसंगने नुकतेच लाँच केलेल्‍या गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजच्‍या विक्रीला आजपासून सुरूवात होईल. 'मेड इन इंडिया' गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२४+ आणि गॅलॅक्‍सी एस२४ स्‍मार्टफोन्‍स लाइव्‍ह ट्रान्‍सलेट, इंटरप्रीटर, चॅट असिस्‍ट, नोट असिस्‍ट व ट्रान्स्क्रिप्‍ट असिस्‍ट वैशिष्‍ट्यांसह येतात.

सॅमसंग कीबोर्डमध्‍ये निर्माण करण्‍यात आलेले एआय देखील रिअल-टाइममध्‍ये हिंदीसह १३ भाषांमध्‍ये मेसेजेस् भाषांतरित करू शकते. कारमध्‍ये अँड्रॉईड ऑटो आपोआपपणे इनकमिंग मेसेजेसही येईल.

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज भारतातील नोएडा येथील सॅमसंगच्‍या फॅक्‍टरीमध्‍ये उत्‍पादित केली जात आहे. सॅमसंगने गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजसाठी विक्रमी प्री-बुकिंग्‍जचा टप्‍पा गाठला आहे, ज्‍यामुळे ही भारतातील आतापर्यंतची सर्वात यशस्‍वी एस सिरीज ठरली आहे.

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज सर्च हिस्‍ट्रीमधील महत्त्‍वपूर्ण टप्‍पा आहे, जेथे हा गुगलसह सर्वोत्तम, गेस्‍चर-संचालित 'सर्कल टू सर्च' असलेला पहिला फोन (Phone) आहे. वापरकर्ते उपयुक्‍त, उच्‍च दर्जाच्‍या सर्च निष्‍पत्ती पाहण्‍यासाठी गॅलॅक्‍सी एस२४ च्‍या स्क्रिनवर सर्कल, हाइलाइट, स्क्रिबल ऑन किंवा टॅप करू शकतात. विशिष्‍ट सर्चेससाठी जनरेटिव्‍ह एआय-समर्थित ओव्‍हरव्ह्यूज उपयुक्‍त माहिती आणि वेबमधून घेण्‍यात आलेले संदर्भ देऊ शकतात.

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमधील प्रोव्हिज्‍युअल इंजिन एआय (AI) टूल्‍सही देण्यात आले आहे. जे फोटो कॅप्‍चर करण्‍याच्‍या क्षमतेमध्‍ये परिवर्तन करते आणि सर्जनशीलता वाढवते. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामधील क्‍वॉड टेलि सिस्‍टम नवीन ५x ऑप्टिकल झूम लेन्‍ससह येते, जी ५० मेगापिक्‍सल सेन्‍सरसोबत काम करते आणि २x, ३x, ५x ते १०x पर्यंतच्‍या झूम लेव्‍हल्‍समध्‍ये ऑप्टिकल-क्‍वॉलिटी परफॉर्मन्‍सची खात्री देते. याचे श्रेय अॅडप्टिव्‍ह पिक्‍सल सेन्‍सरला जाते. सुधारित डिजिटल झूमसह फोटो १००x मध्‍ये अत्‍यंत सुस्‍पष्‍ट दिसतात.

अपग्रेडेट नाइटोग्राफी क्षमतांसह गॅलॅक्‍सी एस२४ स्‍पेस झूमवर कॅप्‍चर करण्‍यात आलेले फोटोज व व्हिडिओज कोणत्‍याही स्थितींमध्‍ये, तसेच झूम केल्‍यानंतर देखील आकर्षक व सुस्‍पष्‍ट दिसतात. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्राचे मोठा पिक्‍सल आकार आता १.४ μm असून ६० टक्‍के मोठा आहे, ज्‍यामुळे अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटोज कॅप्‍चर करता येतात. व्‍यापक ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझर (ओआयएस) अँगल्‍स आणि सुधारित हँड-शेक कम्‍पेन्‍सेशन ब्‍लरिंग कमी करण्‍यास मदत करतात. फ्रण्‍ट व रिअर कॅमेऱ्यांमध्‍ये आवाज कमी करण्‍यासाठी डेडिकेटेड आयएसपी ब्‍लॉक आहे.

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमधील गॅलॅक्‍सी एआय एडिटिंग टूल्‍स इरेज, रि-कम्‍पोज व रिमास्‍टर यांसारख्‍या सोप्‍या एडिट्सची सुविधा देतात. एडिट सजेशन गॅलॅक्‍सी एआयचा वापर करत प्रत्‍येक फोटोसाठी परिपूर्ण योग्‍य

ट्विक्‍सचा सल्‍ला देते, तर जनरेटिव्‍ह एडिट जनरेटिव्‍ह एआयच्या माध्‍यमातून फोटोच्‍या पार्श्‍वभूमीला अधिक आकर्षक करू शकते. कोणत्‍याही वेळी गॅलॅक्‍सी एस२४ फोटो अधिक आकर्षक करण्‍यासाठी जनरेटिव्‍ह एआयचा वापर करू शकतो, तसेच फोटोवर आणि मेटाडेटामध्‍ये वॉटरमार्क दिसेल.

नवीन इन्‍स्‍टण्‍ट स्‍लो-मो अधिक सविस्‍तरपणे गोष्‍टी दिसण्‍याकरिता अॅक्‍शन-पॅक क्षणांना अधिक स्‍लो करण्‍यासाठी हालचालींवर आधारित अतिरिक्‍त फ्रेम्‍सची निर्मिती करू शकते. सुपर एचडीआर शटर प्रेस करण्‍यापूर्वी वास्‍तविक प्रीव्‍ह्यूजचा अनुभव देते.

गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामध्‍ये गॅलॅक्‍सीसाठी स्‍नॅपड्रॅगन® ८ जेन ३ मोबाइल प्‍लॅटफॉर्म आहे, जे अविश्‍वसनीय कार्यक्षम एआय प्रोसेसिंगकरिता उल्‍लेखनीय सुधारित एनपीयू देते. तिन्‍ही गॅलॅक्‍सी एस२४ मॉडेल्‍समध्‍ये १-१२० हर्टझ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट्स परफॉर्मन्‍स कार्यक्षमतेमध्‍ये सुधारणा करतात.

गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा १.९ पट मोठ्या वेपर चेम्‍बरसह येतो, जो डिवाईसच्‍या पृष्‍ठभागावरील तापमान सुधारण्‍यासह शाश्‍वत परफॉर्मन्‍स पॉवर देखील वाढवतो. रे ट्रेसिंग उच्‍च दर्जाच्‍या कॉन्‍ट्रास्‍ट व रिफ्लेक्‍शन इफेक्‍टसह वास्‍तविक व्हिज्‍युअज्‍स देते. गॅलॅक्‍सी एस२४ २६०० नीट सर्वोच्‍च ब्राइटनेस देतो, ज्‍यामुळे हा आतापर्यंतच्‍या ब्राइटेस्‍ट गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन आहे. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामधील कॉर्निंग® गोरिला® आर्मर उच्‍च दर्जाच्‍या टिकाऊपणासाठी ऑप्टिकली सुधारण्‍यात आले आहे.

गॅलॅक्‍सी एस२४+ मध्‍ये ६.७ इंच डिस्‍प्‍ले आहे आणि गॅलॅक्‍सी एस२४ मध्‍ये ६.२ इंच डिस्‍प्‍ले आहे. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामध्‍ये ६.८ इंच फ्लॅटर डिस्‍प्‍ले आहे, जो व्‍युईंगसह उत्‍पादकतेसाठी सानुकूल करण्‍यात आला आहे. गॅलॅक्‍सी एस२४+ आता गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामध्‍ये दिसण्‍यात येणारे क्‍यूएचडी+ आहे. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा टायटॅनियम फ्रेम असलेला पहिला गॅलॅक्‍सी फोन आहे, ज्‍यामुळे डिवाईसच्‍या दीर्घकाळ टिकाऊपणामध्‍ये अधिक वाढ होते.

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्‍यासाठी, तसेच एण्‍ड-टू-एण्‍ड सुरक्षित हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्‍शन आणि सहयोगात्‍मक प्रोटेक्‍शनसह असुरक्षिततेपासून संरक्षण करण्‍यासाठी सॅमसंग नॉक्सद्वारे सुरक्षित आहे. गॅलॅक्‍सी एस२४ वापरकर्त्‍यांना अॅडवान्‍स्‍ड इंटेलिजन्‍स सेटिंग्‍जच्‍या माध्‍यमातून एआय अनुभव वाढवण्‍यासाठी त्‍यांच्‍या डेटावर पूर्णत: नियंत्रण ठेवता येते, जे एआय वैशिष्‍ट्यांसाठी डेटाचे ऑनलाइन प्रोसेसिंग अक्षम करू शकते.

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज उत्‍पादन जीवनचक्र वाढवण्‍याप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेला अधिक पुढे घेऊन जाते, जेथे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या गॅलॅक्‍सी डिवाईसेची सानुकूल कार्यक्षमता दीर्घकाळापर्यंत अनुभवण्‍यास मदत करण्‍यासाठी ओएस अपग्रेड्सच्‍या सात जनरेशन्‍स आणि सात वर्षांपर्यंत सिक्‍युरिटी अपग्रेड्स देण्‍यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT