Gajkesari-Trikoni Yog Saam Tv
लाईफस्टाईल

Gajkesari-Trikoni Yog: गजकेसरी-त्रिकोणी राजयोग! ऑगस्टमध्ये या राशींना मिळेल पैसाच पैसा, गुंतवणूकीसाठी हा काळ उत्तम

Rajyog : जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गजकेसरी आणि त्रिकोण राज योग तयार होतो तेव्हा त्या व्यक्तीला खूप यश आणि प्रसिद्धी मिळते.

कोमल दामुद्रे

August Month Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिना हा अतिशय शुभ मानला गेला आहे. या वर्षी श्रावण मास हा दोन वेळा आल्याने अनेक राशींना शुभ फले प्राप्त होतील. ऑगस्ट महिन्यात दोन अतिशय शुभ योग तयार होणार आहेत. या महिन्यात चार वेळा गजकेसरी राजयोग तयार होणार असून यासोबतच त्रिकोण राज योगही या महिन्यात तयार होणार आहे.

या दोन राजयोगांमुळे चार राशींना खूप फायदा होणार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गजकेसरी आणि त्रिकोण राज योग तयार होतो तेव्हा त्या व्यक्तीला खूप यश आणि प्रसिद्धी मिळते. त्रिकोण राजयोग हा असा शक्तिशाली राजयोग आहे जो कोणत्याही व्यक्तीची वाईट वेळ बदलून त्याची जीवनशैली परिपूर्ण बनवतो. चला जाणून घेऊया या राजयोगामुळे कोणत्या चार राशींना फायदा होईल.

1. मेष

मेष राशीच्या लोकांना गजकेसरी (Gajkesari) आणि त्रिकोण राजयोगाच्या प्रभावाने शुभ परिणाम मिळतील. अपार संपत्ती मिळेल आणि जीवनात यश मिळण्याची शक्यताही वाढेल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही वेळ योग्य आहे आणि तुम्हाला योग्य निकाल मिळेल. व्यवसायात विशिष्ट गुंतवणूक (investment) करण्यासाठी आणि विशिष्ट आर्थिक नफा मिळविण्यासाठी देखील वेळ योग्य असेल. अविवाहितांसाठी काळ शुभ असून त्यांना जीवनसाथी शोधण्याची संधी मिळेल.

2. कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगाने बनवलेले योग तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप चांगले असणार आहेत. करिअरला (Career) नवी दिशा मिळेल. आव्हानांचा खंबीरपणे सामना करण्यासाठी आणि जीवनात चांगले परिणाम मिळविण्यासाठी ही एक शुभ स्थिती आहे. यशस्वी होण्यासाठी, योग्य ध्येय निश्चित करा यासोबतच तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या योग्य संधीही मिळतील. या दरम्यान तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध खूप चांगले राहतील.

3. तूळ

गजकेसरी आणि त्रिकोण राज योगाच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या लोकांना चांगले आर्थिक लाभ होणार आहेत. या काळात कौटुंबिक जीवनही खूप चांगले असणार आहे. कोर्टाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कला संगीताशी संबंधित लोकांना प्रसिद्धी आणि कलेतून लाभ मिळेल. यामुळे या काळात तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. कौटुंबिक तणाव कमी होईल. गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला आहे.

4. मकर

लवकरच नवीन वाहन खरेदी करू शकता. मालमत्ता गुंतवणुकीसाठी चांगला काळ. सासरच्या मंडळींशी चांगले संबंध निर्माण होतील, तसेच सासरच्या लोकांकडून तुम्हाला कोणत्याही स्वरूपात लाभ मिळतील. हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT