Gajkesari Rajyog saam tv
लाईफस्टाईल

Gajkesari Rajyog: 12 वर्षांनंतर बनणार गजकेसरी राजयोग; चंद्र-गुरूच्या कृपेने मिळणार भरघोस पैसा

ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ योगांबद्दल सांगितले आहे, त्यापैकी 'गजकेसरी राजयोग' हा सर्वात महत्त्वाचा आणि धन-समृद्धी देणारा मानला जातो. अशाच येत्या काळात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, साल 2026 च्या सुरुवातीला अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होणार आहेत. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. जानेवारी महिन्यात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

गजकेसरी राजयोगहा गुरु आणि चंद्र यांच्या युतीने कर्क राशीत निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात नवीन नोकरीच्या संधी, अपार धनलाभ आणि प्रगतीचे योग तयार होतील. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीतील करिअर आणि व्यवसायाच्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते.

कर्क रास (Cancer Zodiac)

गजकेसरी राजयोगामुळे कर्क राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा योग तुमच्या गोचर कुंडलीतील लग्न भावात तयार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि सूज्ञ निर्णयक्षमतेने तुम्ही योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग लाभदायी ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात तयार होईल. मार्केटिंग, मीडिया, बँकिंग किंवा शेअर बाजाराशी संबंधित तुमचं काम असेल तर तुम्हाला चांगला फायदा होईल. मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरूणीच्या गळ्यावरून चाकू फिरवला; घरात रक्ताचा सडा, बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं, कारण काय?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर'च्या कमाईत घसरण, रितेश देशमुखच्या 'मस्ती 4'नं किती कमावले?

Sabudana Chivda Recipe: उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबरे घालून कुरकुरीत साबुदाणा चिवडा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT