benefits of banyan tree  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पानांपासून- फळांपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल वटवृक्ष

वटवृक्ष आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जाणून घेऊया त्याचे फायदे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतात अनेक धार्मिक कार्यात वडाच्या पानाला पूजेत वापरले जाते. वडाचे झाड अतिशय पवित्र वृक्ष मानले जाते. (benefits of banyan tree)

हे देखील पहा -

वटवृक्ष हे मोठे, सदाहरित पानझडी वृक्ष आहे. त्यांच्या फांद्या अधिक लांब, मूळ ही जमिनीखाली रूतलेली व खोड आधार देणारे आहे. वटवृक्ष हे शतकानुशतके जगण्याच्या आणि वाढण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जाते. वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. वटवृक्ष आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि ते शरीराला अनेक प्रकारे आरोग्यदायी फायदे देतो ते कसे हे जाणून घ्या.

वडाच्या फळांचा व पानांचा आरोग्यासाठी होणारा फायदा

१. वडाच्या झाडाची मुळे चघळल्याने हिरड्यांचे आजार, दात किडणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे थांबते. त्याची बाह्य मुळे नैसर्गिक टूथपेस्ट म्हणून काम करतात आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे दातही मजबूत होतात.

२. वडाच्या फळात मॅग्नेशियम, फॉस्फरस, ओमेगा ३ आणि ६ सारखी नैसर्गिक खनिजे आहेत जी रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयरोगासाठी उपयुक्त ठरते.

३. वडाच्या झाडाच्या सालीचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होईल. तसेच सालीमुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

४. वडाच्या पानांच्या कळ्याचा वापर अतिसार आणि आम्लपित्तावर उपायकारक ठरेल. तसेच अतिसारापासून लवकर आराम मिळतो.

५. वजन कमी करण्यासाठी वटवृक्षाच्या फळांचा रस दूध (Milk) आणि साखरेशिवाय प्यायल्याने प्रभावी ठरेल. वडामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करतात.

६. वडाच्या फळामध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे (Vitamins) जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपली दृष्टी चांगली राखण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT